सावंगी मेघे येथे सायबर जनजागृती कार्यशाळा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 29.08.2023 रोजी सकाळी 11.00 ते 01.00 वा. दरम्यान फॅकल्टी ऑफ सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजी, सावंगी मेघे, वर्धा येथे पोलीस विभाग सायबर जनजागृती व कायदेविषयक माहिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
आजच्या बदलत्या व शिघ्रगतीने प्रगत होणा-या यूगात विद्यार्थ्यांवर पालक वा शिक्षक म्हणून लक्ष ठेवणे जिकरीचे झाले आहे तसेच पौगंडावस्थेतील मुलांचे गुन्हेगारी मार्गांनी जाण्याचे वा नकळत कायद्याचे चौकटीत न बसणारी कामे थ्रील म्हणून करून पाहण्याचे प्रमाण वाढलेले आहे असे असतांना मा. पोलीस अधिक्षक वर्धा श्री. नूरूल हसन साहेब यांचे मार्गदर्शनात सायबर पो.स्टे. तर्फे पोलीस विभाग व विद्यार्थी यांचा संवाद घडवून आणून त्यांना सायबर विश्वातील अडथळे, धोके व काळजी यांची जाणीव करून देण्याची एक मोहिम हाती घेण्यात आलेली आहे.
सायबर सेल, वर्धा तर्फे पो.हवा. कुलदीप टांकसाळे व म.पो.शि. स्मिता महाजन यांनी इंन्स्टाग्राम, फेसबूक, व्हॉट्सअॅप व इतर सोशल मिडीयाचे हॅकिंग/डयूप्लीकेशन पासून वाचण्याचे उपाय व त्यांचा गैरवापर रोखण्याकरीता व सायबर जगात स्वतःला सुरक्षीत ठेवण्याच्या उपायांची माहिती दिली. ऑनलाईन बॅंकीग व्यवहारातील फसवणूक, यु.पी.आय. फ्रॉड, ईलेक्ट्रीसीट बिल फ्रॉड, फॉरेक्स ट्रेडींग, क्रीप्टो ट्रेडींग, डीप फेक वेब यासारखे नवनवीन फसवणूकीचे प्रकार व त्यापासून बचावाकरीता उपाययोजनांची माहिती देण्यात आली. शासनातर्फे हरविलेले मोबाईल शोध व ऑनलाईन फसवणूक थांबविण्याकरीता सुरू करण्यात आलेले सी.ई.आय.आर. पोर्टल व एन.सी.सी.आर.पी. पोर्टल यांचे संबंधाने माहती देण्यात आली. तसेच सदरची माहिती आपले पालक, नातेवाईक व मित्रपरीवार यांना सुध्दा सतर्क करण्याचा इशारा देण्यात आला.
गुन्हा होण्यापूर्वी त्यावर प्रतिबंध, ज्ञानवर्धन व जनजागृती हाच नुकसानापासून वाचण्याचा सर्वात चांगला उपाय आहे. हाच संदेश यातील सर्व वक्त्यांनी दिलेला आहे.
सदर कार्यक्रमाला कॉलेजचे डीन डॉ चित्रा ढवळे, एच.ओ.डी. प्रो. सुप्रया नरड, प्रो. रिना सातपूते, प्रो. मोना डेकाटे, प्रो. प्राची जोशी, प्रो. प्रांजली उल्हे, प्रो. कल्याणी साटोणे, प्रो. भावना कूबडे, प्रो. सुधीर आगरमोरे व 127 विद्यार्थी उपस्थीत होते.