राजुरा येथे जनसंवाद पदयात्रा नियोजनार्थ कार्यकर्ता बैठक संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे
चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली गांधी भवन राजुरा स्थित तालुका काँग्रेसचे जनसंपर्क कार्यालय येथे दि. ३ ते १२ सप्टेंबर २०२३ या दरम्यान अखिल भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे राष्ट्रीय नेते जननायक राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेच्या धर्तीवर होणाऱ्या ऐतिहासिक जनसंवाद पदयात्रेच्या नियोजनार्थ आढावा बैठक पार पडली. या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून प्राप्त झालेल्या सर्व सुचना व दिशानिर्देशानुसार तालुका पातळीवर जनसंवाद पदयात्रा यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष आ. सुभाष धोटे यांनी केले.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, तालुकाध्यक्ष रंजन लांडे, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा कविता उपरे, माजी नगरसेवक सुनील देशपांडे, कृ. उ. बा. समितीचे संचालक अॅड. अरूण धोटे, यासह तालुका काँग्रेसच्या विविध संघटनांचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कृ. उ. बा. समितीचे संचालक, माजी जि. प सदस्य, माजी प. स. सदस्य, सेवा सहकारी संस्थांचे संचालक, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य यासह शेकडोंच्या संख्येने गावपातळीवरील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.