ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सिंदखेडराजा मतदार संघातील विकासकामावरील स्थगिती उठविली

28 कोटींची विकास कामे मार्गी लागणार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

सिंदखेडराजा मतदार संघात सुरु असलेल्या सुमारे 28 कोटी रुपयांच्या विकास कामांना राज्य शासनाने मधल्या काळात स्थगिती दिली होती, ती आता उठविण्यात आली असल्याची माहिती आमदार डॉ राजेंद्र शिंगणे यांनी दिली.

यासाठी उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी पाठपुरावा केल्याचे सांगितले. सिंदखेडराजा व देऊळगाव राजा नगर पालिकेसाठी वाढीव 5 कोटी रुपयांच्या विकास निधी ला सुद्धा मान्यता देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले, दरम्यान या विकास कामांना शासनाने स्थगिती दिल्यामुळे आमदार डॉ राजेंद्र शिंगणे कोर्टात जाण्याची भूमिका घेतली होती, परंतु उप मुख्यमंत्री अजित पवारांनी पाठपुरावा केल्यामुळे स्थगिती उठविल्या मुळे आता ही विकास कामे मार्गी लागतील, अजित पवारांनी शिंदे फडणवीस सरकार मध्ये सहभागी होत उप मुख्यमंत्री व अर्थमंत्री म्हणून पदभार हाती घेतल्या नंतर तातडीने ही स्थगिती उठविण्याचा निर्णय घेतल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग व ग्राम विकास विभागाशी संबंधित विकास कामे मार्गी लावण्यासाठी मदत होईल.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये