Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नागपंचमीच्या दिवशी श्री बालाजी महाराज वार्षिक उत्सवांचे मुहूर्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

गत ३३० वर्षांची परंपरा असलेला श्री बालाजी महाराजांचा वार्षिक उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या या यात्रोत्सवात महाराष्ट्रभरातून लाखो भाविक सहभागी होत असतात. या उत्सवात देऊळगाव राजा शहरातील अठरापगड जातींना परंपरेने चालत आलेले त्यांचे मान व हक्क आजही दिले जातात व त्यांना वेगवेगळे कार्य देऊन उत्सवात सामावून घेतले जाते. अशा प्रकारे सर्व अठरापगड जातींना सामावून घेतल्यामुळे श्री बालाजी महाराज देवस्थान हे भक्तांचे श्रद्धास्थान आणि सर्वधर्मसमभावाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते.

श्री बालाजी संस्थानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रावण शु. ५, नागपंचमीच्या मुहूर्तावर सायंकाळी ५:०० वाजता ब्राह्मण समाजाच्या उपस्थितीत श्री बालाजी महाराजांच्या वार्षिक उत्सवांचे मुहूर्त काढण्यात आले. यावर्षी घटस्थापना आश्विन शु. १ अर्थात रविवार दि. १५ ऑक्टोबर रोजी होईल. मंडपोत्सव हा आश्विन शु. ८ म्हणजेच रविवार दि.२२ ऑक्टोबर रोजी होईल. दसरा पालखी उत्सव आश्विन शुद्ध ९ सह १० म्हणजेच सोमवार दि.२३ ऑक्टोबरच्या मध्यरात्री होईल. लळित उत्सव आश्विन व. ४ अर्थात बुधवार दि.१ नोव्हेंबर रोजी सूर्योदयी होईल.

हा मुहूर्त काढण्यापूर्वी शिंपी समाजाच्या उपस्थितीत
रीतीरिवाजाप्रमाणे सकाळी १०:०० वाजता मंडपोत्सवासाठी मंडप शिलाई साहित्याचे पूजन करण्यात आले. यावेळी श्री बालाजी महाराज संस्थानचे वंशपारंपरिक विश्वस्त राजे विजयसिंह जाधव, व्यवस्थापक श्री किशोर बीडकर यांच्यासह कर्मचारी व मानकरी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये