ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गडचांदूर न.प. चे संगणक अभियंता प्रितिश मगरे यांची मुख्याधिकारी पदी निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

गडचांदूर नगर परिषद येथे संगणक अभियंता म्हणून कार्यरत असलेले श्री प्रितिश अजबराव मगरे यांनी विभागीय परीक्षेत घवघवीत यश मिळविले असून त्याची मुख्याधिकारी म्हणून निवड झाली आहे.
मराठवाडा मधील जालना जिल्ह्यातील जाफराबाद नगर पंचायत मध्ये ते रूजू होणार आहेत.

अतिशय मनमिळाऊ, शांत संयमी स्वभाव चे प्रितिश कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ५ वर्षे गडचांदूर नगर परिषद मध्ये कार्य केले आहेत.

प्रितिष मगरे यांची मुख्याधिकारी पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहेत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये