Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चिमूर,देवरी, ब्रह्मपुरी, विधानसभा क्षेत्रासाठी “संपर्क से समर्थन “अभियानासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे ब्रह्मपुरीत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदु गुद्देवार

संपूर्ण राज्यभर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे “संपर्कसे समर्थन अभियान” अतिशय जोरकसपणे राबवित आहेत. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ता आणि मतदारांमध्ये नवसंजीवनी देण्याकरिता तसेच येत्या लोकसभा निवडणुकीची समर्थ तयारी करण्याकरिता “संपर्क असे समर्थन अभियान” चिमूर, देवरी, ब्रह्मपुरी या विधानसभा क्षेत्रासाठी ब्रह्मपुरी येथे दिनांक 23 ऑगस्ट 2023 रोजी ठिक 3.30 वा.भव्य रॅलीचे आयोजन, 4. 45 वा. पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक, सायं. 6.45 वा. प्रतिष्ठित व्यक्तींच्या भेटी असे या कार्यक्रमाचे स्वरूप असून ही बैठक लोढिया हाल ब्रह्मपुरी येथे आयोजित करण्यात आली आहे.

या कार्यक्रमाला चिमूर,देवरी, ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रांतील शक्ती पालक तसेच प्रमुख पदाधिकारी राहणार आहेत. खासदार अशोक नेते, डॉ. उपेंद्रजी कोठेकर, किसनजी नागदेवे, हरीशजी शर्मा, मान. मेश्राम,प्रशांतजी वाघरे इ. मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

देवरी विधानसभा क्षेत्रातून केशवराव मानकर, संजयजी पुराम,नागापुरे तर चिमूर विधानसभा क्षेत्रातून आमदार कीर्ती कुमार भांगडिया, गणेशजी तर्वेकर तर ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातून प्रा. अतुल देशकर इ. मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये