Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रेहकीवासी यांचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन

सेलू येळाकेळी आर्वी रस्त्यावर करणार चक्काजाम आदोलन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

रेहकी ता.सेलू गावातील मुख्य रस्त्याचं काम कार्यकारी अभियंता मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, दिनांक 11/6/19 नुसार कामे अताशा आर्शीवाद बिल्डर्स, नागपूर दिलेले सरकारी मुदत दिनांक १० मार्च २०२० पर्यंत असताना काम अद्यापही पूर्ण झाले नसल्याने या सध्या स्थितीमध्ये सदर गावांमधील मुख्य रस्ता हाच असून त्यावरील काम जुन्या जून महिन्यापासून सुरू असून पूर्वी असलेला पूल तोडून नवीन पूल बांधकाम अजूनही सुरुवात करण्यात आलेली नाही

त्यामुळे गावातील नागरिक विद्यार्थी व शेतकरी यांना जाण्याकरिता अडथळा येत आहे या पुलाचे काम लवकर करण्यात यावे यासाठी कार्यकारी अभियंता मुख्यमंत्री ग्रामसडक योजना यांना निवेदन देण्यात आले होते परंतु अजूनही काही झाले नसल्यामुळे रेहकीवासी यांनी उद्या सेलू येळाकेळी आर्वी रस्त्यावर चक्काजाम आंदोलन करण्याबाबत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये