Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एन.सी.सी.छात्र सैनिकांनी 2500 राख्या सीमेवर पाठवल्या 

'एक राखी सीमेवरील सैनिकांसाठी' उपक्रम 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

      स्थानिक 21 महाराष्ट्र एन.सी.सी.बटालियन अंतर्गत देवळीच्या एस.एस.एन.जे. महाविद्यालयातील एन.सी.सी. छात्र सैनिक व रोव्हर्स-रेंजर्स नी 2500 राख्या तयार करून सीमेवरील सैनिकांना पाठविल्या.

दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही रक्षाबंधनानिमित्त ‘एक राखी सीमेवरील सैनिकांसाठी’ हा उपक्रम राबविण्यात येवून एन.सी.सी.छात्र सैनिकांनी तसेच रोव्हर्स व रेंजर्स यांनी राख्या तयार करून सीमेवरील सैनिकांकरीता सदर राख्यांचे पॅकेट्स एन.सी.सी. अधिकारी कॅप्टन मोहन गुजरकर यांना 23 ऑगस्ट रोजी एका विशेष कार्यक्रमात सुपूर्त केल्या. स्थानिक प्रहार समाज जागृती संस्थेच्या वतीने सदर राख्या पाठवल्या जातात.

या प्रसंगी राज्य स्तरीय स्थल सेना कॅम्प शिबिरात निवड होऊन त्यात प्राविण्य प्राप्त कॅडेटसना सन्मानित करण्यात आले. यात कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या शिबिरात अंडर ऑफिसर राखी खोडे हिने ‘निशानेबाजी’ तर सार्जंट खुशी पचारे हिने ‘टेन्ट पिचिंग’ स्पर्धेत भाग घेतला. अहमदनगर जिल्ह्यातील लोणी येथे संपन्न झालेल्या कॅम्पमध्ये अंडर ऑफिसर अक्षय जबडे, सार्जंट शेखर भोगेकर व कॅडेट हरिओम उईके यांचा समावेश होता.

सदर कार्यक्रमाचे संचालन सार्जंट मोहिनी पेटकर व अंडर ऑफिसर राखी खोडे यांनी तर आभार सार्जंट वैष्णवी शिरभाते हिने मानले.

यशस्वीतेकरीता अंडर ऑफिसर अक्षय जबडे, शेखर भोगेकर, प्रतीक क्षीरसागर, हरिओम उईके, खुशी पेटकर व छात्र सैनिकांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये