Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्धा जिल्ह्यातील ०६ सराईत गुन्हेगारांना केले तडीपार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा जिल्ह्यातील गुन्हेगारांचा समुळ उच्चाटन करण्याचे उद्देशाने मा. पोलीस अधीक्षक, श्री. नूरुल हसन यांनी वर्धा जिल्हयातील शरीराविरुध्दचे गुन्हे करण्याचे सवईचे आहेत लोकांमध्ये दहशत निर्माण करणे, जिवाणे मारण्याची धमकी देणे, घातक शस्त्र बाळगणे, जुगार बंदीचे गुन्हे करणारे, दारुबंदी कायदयान्वये गुन्हे करणारे, शासकिय कर्मच्याऱ्यांवर हल्ला करणारे व्यक्ती विरुध्द मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वये तडीपार प्रस्ताव सादर करण्या बाबात आदेशीत केले होते.

त्यानुरसार पोलीस स्टेशन हिंगणघाट व वडनेर ठाणेदार यांनी सादर केलेल्या प्रस्तावावरुन मा. उपविभागीय दंडाधीकारी साहेब, हिंगणघाट यांचे आदेशान्वये खालील नमुद सराईत गुन्हेगारांना वर्धा जिल्हातुन तडीपार केले आहे.

१) अविनाश उर्फ बदी रमेश भाईमारे वय २८ वर्ष रा गाडगेबाबा वार्ड शितलामाता मंदिरा जवळ हिंगणघाट, वर्धा २) अजय रामचंद्र पवार वय २९ वर्ष रा. फुकट ता. हिंगणघाट जि वर्धा

४) अनंता भानुदास मेंढे वय ३२ वर्ष रा. टाकळी ता हिंगणघाट, वर्धा ५) अमोल भिमराव भगत, वय ३८वर्ष रा. टाकळी ता. हिंगणघाट जि. वर्धा

३) आकाश धनाजी बावणे वय २१ वर्ष रा. फुकट ता. हिंगणघाट जि वर्धा ६) दिलीन नानाजी सातघरे वय ३६ वर्ष रा दोदुर्डा ता. हिंगणघाट, वर्धा

सदर आदेश तामीली करीता पोलीस स्टेशन हिंगणघाट व पोलीस स्टेशन वडनेर येथील अधिकारी व अंमलदार यांनी सदर तडीपार गुन्हेगारांचे शोध संबंधाने युध्द स्तरावर मोहीम राबवुन त्यांचा शोध घेवुन अंमलबजावणी करण्यात येणार असुन त्यांना वर्धा जिल्हयातुन घालवुन देण्यात आले आहे.

सदरची कामगीरी सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक, श्री. नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक, डॉ. सागर रतनकुमार कवडे यांचे मार्गदर्शनात पो. नि. मारुती मुळुक, पोलीस स्टेशन हिंगणघाट आणि स.पो.नि संजयकुमार मिश्रा पोलीस स्टेशन वडनेर, पो. नि. संजय गायकवाड, स्था.गु.शा. वर्धा तसेच पो उप नि. ओमप्रकाश नागापुरे, पो.शी दिनेश करलुके यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये