ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हयातील पोलीस पाल्यांकरीता, निवृत्त पोलीस अंमलदारांच्या पाल्यांकरीता तसेच गृहरक्षकांच्या पाल्यांकरीता रोजगार मेळाव्याचे आयोजन

पोलीस कर्मचारी, सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी व गृहरक्षकांचे पाल्य यांनी जास्तीत जास्त संख्येने या रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे. असे आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा जिल्हा पोलीस व ईला हायरींग टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमानाने वर्धा जिल्हयातील पोलीस पाल्यांकरीता, निवृत्त पोलीस अंमलदारांच्या पाल्यांकरीता तसेच गृहरक्षकांच्या पाल्यांकरीता रोजगार मेळाव्याचे आयोजन दिनांक 25.08.2023 रोजी सकाळी 09.30 ते दुपारी 04.00 वा. पर्यंत करण्यात येत आहे.
ज्या उमेदवारांनी आॅनलाईन रजिस्ट्रेशन केलेले आहे त्यांनी आपले सर्व कागदपत्रांसह आषिर्वाद मंगल कार्यालय, पोलीस मुख्यालय, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चैक, वर्धा येथे सर्व कागदपत्रांसह हजर रहावे.
ज्या पोलीस पाल्यांना, निवृत्त पोलीस अंमलदारांच्या पाल्यांना तसेच गृहरक्षकांच्या पाल्यांना रजिस्ट्रेषन काही कारणांस्तव करता आले नाही त्यांनी सोबतचा क्यूआर कोड स्कॅन करून आॅनलाईन गुगल फाॅर्म भरून आवेदन सादर करावयाचे आहे. तसेच मेळाव्याचे दिवषी आषिर्वाद मंगल कार्यालय, वर्धा येथे फाॅर्म भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
सदर रोजगार मेळाव्यामध्ये नागपूर व वर्धा जिल्हयातील जवळपास 10 नामांकीत कंपन्यां सहभागी करण्यात आले आहे. तरी पोलीस कर्मचारी, सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी व गृहरक्षकांचे पाल्य यांनी जास्तीत जास्त संख्येने या रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे. असे आवाहन मा. पोलीस अधिक्षक श्री. नूरूल हसन साहेब यांनी केलेले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये