ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विधी सेवा प्राधिकरण व चैतन्य सेवाभावी संस्था यांचे सयुंक्त विद्यमाने कार्यशाळेचे आयोजन

मांडवा येथे आदिवासी दिवसाचे औचित्य...

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

मांडवा येथे आदिवासी दिवसाचे औचित्य साधून विधी सेवा प्राधिकरण व चैतन्य सेवाभावी संस्थ..वर्धा यांचे सयुंक्त विद्यमाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात उपस्थित मान्यवर विधीसेवा प्राधिकरणाचे सचिव मा.न्यायाधीश श्रीमान विवेक देशमुख सर तसेच वर्धा वकील संघाचे अध्यक्ष मा. अँड लोहवे सर तसेच वर्षा वकील संघाच्या उपाध्यक्ष अँड अनिता ठाकरे, सचिव अॅड अनुजा देशपांडे सहसचिव अँड छगनकर तसेच ग्रंथपाल अॅड. प्रिया चावरे त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आदिवासी एकात्मीक बाल प्रकल्प अधिकारी मा. श्री. खडसे सर व मांडवा येथील सरपंच श्री उईके तसेच मांडवा येथील ग्रामसेवक श्री. साळवे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आदिवासींच्या शासकीय योजना तसेच आदिवासींकरिता मोफत व उपलब्ध असलेल्या शैक्षणीक योजना याबद्दल गावातील उपस्थित असलेले आदिवासी मंडळींना विस्तृतपणे मार्गदर्शन केले.

मा.न्या. देशमुख साहेब यांनी आदिवासी बाबत विस्तृतपणे मार्गदर्शन करून आदिवासी बद्दलची संकल्पना विस्तृत केली. तसेच वाईल्ड अॅनिमल्स प्रोटेक्शन कायदयाविषयी मार्गदर्शन केले, वर्धा वकील संघाचे अध्यक्ष मा. श्री. लोहवे सर यांनी अनुसूचीत जाती जमाती कायदयाबाबत मार्गदर्शन केले तसेच वर्धा वकील संघाच्या अध्यक्ष अनिता ठाकरे पानी अनुसूचीत जाती जमाती प्रतिबंधक कामदयावर मार्गदर्शन केले, तसेच सचिव अँड अनुजा देशपांडे, सहसचिव श्री. छगनकर पानी उपस्थित असलेल्या गावकरी मंडळांना त्यांना उपलब्ध असलेल्या शासकीय योजनेचा फायदा घेण्याबाबत व पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे आभार मांडवा येथील कार्यकर्ते श्री बावने यांनी मानले तर कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता मांडवा येथील रहिवाशी श्री. प्रदिप हिवरे व प्रदिप रामटेके यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला मोठया संख्येने मांडवा गावातील आदिवासी गावकरी मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते..

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये