महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स मध्ये शिक्षणाचे सार्वत्रिककरणावर कार्यक्रम संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे
महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स गडचांदूर येथे दिनांक 22ऑगस्ट 2023 रोज मंगळवरला Awareness of Enlightenment Education in Tribal Area या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमासाठी कु. यिशिता काळे प्रमुख मार्गदर्शक म्हणून मंचावर उपस्थित होते. कु. यीशिता यांनी माहिती तंत्रज्ञानात अभियांत्रिकीची पदवी घेऊनही दुर्गम भागातल्या आदिवासी मुलांमुळीसाठी शिक्षण प्रसारचे अविरत काम करत आहे. पर्यावरण संरक्षणासाठी जागृती निर्माण करत आहे. आपल्या शिक्षणाचा उपयोग समाजाच्या उत्थानासाठी लावणारे यिशितासारखे कमीच असतात.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेंद्र देव हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच उद्यमशील ते कडे वळण्याकरिता प्रोत्साहित करण्यात आले. देशात वाढणाऱ्या बेरोजगारीला सामोरे जाताना विद्यार्थी जीवनापासूनच उद्यमशीलतेचे गुण अंगी बाळगावे व शिक्षणासोबतच उद्यमशीलतेकडे सकारात्मक दृष्टीने बघून जीवनात मार्गक्रमण करावे या आशयाचे मार्गदर्शन कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री विठ्ठलरावजी थिपे यांनी विद्यार्थ्यांना केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य शैलेंद्र देव यांनी सेवा शिक्षण यांना नोकरी एवढीच प्रतिष्ठा मिळावी याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या शेवटी श्री रामकृष्ण पटले यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. सदर कार्यक्रम आयोजित करण्याकरिता श्री. मनोहर बांदरे तथा श्री पवन चटारे यांनी विशेष प्रयत्न केले.याव्यतिरिक्त इतर प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते.