Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

संपादित केलेल्या शेतजमिनीसाठी शेतकऱ्यांची प्रशासकीय अधिकाऱ्यांकडूनच दिशाभूल!

मोबदल्यासाठी शेतकऱ्यांच्या प्रशासनाकडे खेटा

चांदा ब्लास्ट

सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. २ चंद्रपूरने मूल तालुक्यातील नलेश्वर सिंतळा प्रमुख जिल्हा मार्ग रस्त्याला रहदारी वाढल्याने उमा नदीवर पूलाचे बांधकाम व रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी काही शेतकऱ्यांच्या शेतजमिनी सन २०१९ मध्ये संपादित केल्या. सन २०२० मध्ये कामसुद्धा सुरू झाले. परंतु शेतजमीन संपादित करताना अत्यल्प मोबदला ठरविल्याने शेतकऱ्यांनी रोष व्यक्त करीत योग्य मोबदला देण्यात यावा.
यासाठी प्रशासनाकडे अनेकदा निवेदन दिले. मात्र, प्रशासनाने अद्यापही याची दखल घेतली नसून, मोबदल्यापासूनसुद्धा वंचित ठेवले आहे. त्यामुळे संपादित केलेल्या शेतजमिनीसाठी शेतकऱ्यांची प्रशासकीय यंत्रणेकडूनच दिशाभूल केली जात असल्याने शेतकरी मोबदल्यासाठी प्रशासनाकडे खेटा घालत आहे.
मूल तालुक्यातील नलेश्वर सिंतळा या मार्गावरील उमा नदीवर पूलाचे बांधकाम व रस्ता रुंदीकरणासाठी अतिरिक्त जमिनीची आवश्यकता असल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. २ चंद्रपूर येथील अधिकाऱ्यांनी सन २०१९ मध्ये काही शेतकाऱ्यांशी संपर्क साधला. सदर रस्ता रुंदीकरणाला व उमा नदीवर पूल बांधकामाला तुमच्या जमिनीची आवश्यकता आहे व सदर जमिनिचे संपादन आपसी वाटाघाटीने केल्या जाईल असे सांगीतले.
यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. २ व भुसंपादन अधिकारी, उपविभागीय अधिकारी मूल यांनी चक दहेगाव येथील नलेश्वर सिंतळा रस्त्याला लागून असलेली, रेखा धोडरे, मिलींद सातपुते, कालीदास सोमनकर, गुरुदेव सोमनकर, नारायण सोमनकर, संगीता सोमनकर, विलास सोमनकर, बंडू किरमे, मंगला गुरनुले, मनोज लेनगुरे यांचे मालकीची चक दहेगाव तह. मूल, जिल्हा चंद्रपूर येथील सर्व्हे क्र. ११७, आराजी ०.१७ हे. आर. सर्व्हे क्र. १३३, आराजी ०.०२ हे. आर., सर्व्हे क्र. १३५, आराजी ०.०२ हे. आर., सर्व्हे क्र. १३६, आराजी ०.०३ हे. आर. सर्व्हे क्र. १३७, आराजी ०.०७ हे. आर. सर्व्हे क्र. १३२/१, आराजी ०.२२ हे. आर. शेतजमीन संपादीत केली व सदर जमिनीवर असलेले निलगिरी व सागाची एकूण ५५० झाडे तोडली. सदर शेतजमीन संपादीत करतांना सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. २ चंद्रपूर यांनी किंवा भुसंपादन अधिकारी मूल यांनी सदर शेतमालकांना कोणतीही लेखी सुचना दिली नाही किंवा कोणतीही संमती घेतली नाही.
सदर संपादीत झालेल्या शेतजमीनीचा मोबदला आम्ही आजच्या बाजार भावाने तुम्हाला देवू असे सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. २ चंद्रपूर यांचे अधिकारी यांनी शेतमालकांना फक्त तोंडी आश्वासन दिले होते. त्यावेळेस सदर बांधकाम हे विकासात्मक असल्यामुळे व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदार क्षेत्रातील असल्यामुळे प्रशासकीय अधिकाराऱ्यांनी सदर संपादनाचा मोबदला दिला नाहीतर पालकमंत्री आम्हाला मोबदला काढून देतील, असा विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी सदर संपादनाला कोणताही विरोध केला नाही.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. २ यांनी सदर उमा नदीवरील पुलाचे बांधकाम व रस्ता रुंदीकरणाचे काम पुर्ण केले. परंतु आज साडेतीन वर्षाचा कालवधी होवून सुध्दा संपादीत केलेल्या जमीनीचा कोणताही मोबदला प्रशासनाने त्या शेतजमीन मालकांना दिला नाही. याबाबतचे अनेक निवेदन, तोंडी विनंती सदर शेतजमीन मालकांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर, भुसंपादन अधिकारी मूल, व सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. २ चंद्रपूर यांना दिले.
परंतु आजपावेतो प्रशासनाने त्यांना कोणताही मोबदला दिला नाही. प्रशासनानेच शेतकऱ्यांची मोबदला देण्यासाठी दिशाभूल  केली असल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त केला जात असून, पीडित शेतकऱ्यांना शासनाने संपादित केलेल्या मोबदला देण्यात यावा, अशी मागणी गुरुदेव सोमनकर यांनी केली आहे.
शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये