Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अनोळखी इसमाची ओळख पटल्यास संबधित क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

       सविस्तर, घटना दिनांक 19/08/2023 से 15:00 वा चे दरम्याण मच्छी मार्केट इतवारा बाजार, वर्धा या स्थळी फिर्यादी विक्की बाबुलाल सोळंके वय २६ वर्ष हा मच्छी मार्केट वर्धा येथे फिरत असतांना त्याला नगर परिषदचे नवीन बांधकाम केलेल्या मच्छी मार्केट इतवारा बाजार वर्धा येथे एक अनोळखी इसम वय अंदाजे 45 ते 50 वर्ष वयाचा इसम झोपुन असल्यासारखा दिसला. त्याचे जवळ जाऊन जोर जोरात आवाज देऊन तसेच हात लाऊन ऊठवीन्याचा प्रयत्न केला असता तो काहीच हालचाल करीत नसल्याचे फिर्यादी विक्की बाबुलाल सोळंके वय 26 वर्ष रा. मच्छी मार्केट, इतवारा बाजार, वर्धा चे लक्षात आले की सदर इसम हा मयात झाला आहे. म्हणुन फिर्यादीने दिनांक 19/08/2023 चे 18:00 वा. डायल 112 वर फोन करून सांगीतले अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून पोस्टे वर्धा (श) येथे मर्ग नंबर 66/2023 कलम 174 जा. फो. चा नोंद करून चौकशीत घेतला आहे.

      मृतकाचे वर्णन एक अनोळखी इसम वय अंदाजे 45 ते 50 वर्ष (पुरुष)रंग सावळा उंची 5 फुट 5 इंच चेहरा लांबट, केस काळे पांढरे, दाढी बारीक, तिळ पाठीवर, पोशाख अंगात शेंदरी रंगाचा फुल बाह्याचा शर्ट, काळ्या रंगाचा फुल पैन्ट, व त्या खाली कथी या रंगाची अंडरवेअर घातलेला आहे. तरी वरील वर्णनाच्या मृतकाचा व त्याच्या नातेवाईकाचा आपआपले पो.स्टे. हद्दीत शोध घेवून माहीती मिळाल्यास पो स्टे वर्धा शहर येथे खालील क्रमांकावर कळवावे.

माहीती देण्यासाठी कार्यलयाचा पत्ता व संपर्क नंबर-पो. स्टे वर्धा शहर 07152-232506, पोलीस निरीक्षक कैलास पुंडकर मो.नं. 9309835331 तपासी अंमलदार पो. हवा. राजेश राठोड ब.नं. 879 पोस्टे वर्धा (श) मो.नं. 9552909873

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये