भगवान बिरसा मुंडा यांच्या 151 व्या जयंती निमित्त कोरपण्यात भव्य जनजातीय गौरव दिन उत्साहात साजरा
आदिवासी समाजाच्या सर्वागीण विकासासाठी आमदार देवराव भोगळे यांनी भव्य आदिवासी सभागृह कोरपणा नगरीत उभारणार
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
आदिवासी जननायक, क्रांतिकारी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधून काल कोरपना येथे आदिवासी सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने आयोजित केलेल्या पारंपरिक ‘गोंडी ढेमसा नृत्य स्पर्धेस उपस्थित राहून आदिवासी बांधवांचा उत्साह द्विगुणित केला.
भगवान बिरसा मुंडा यांनी जल, जंगल, जमीन आणि आदिवासी बांधवांच्या हक्कांसाठी दिलेला लढा आजही आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. आदिवासी संस्कृती, परंपरा आणि लोककलांचे जतन व संवर्धन व्हावे, या उद्देशाने ‘आदिवासी ढेमसा’ यासारख्या स्पर्धेचे आयोजन करणे आवश्यक आहे. गोंडी ढेमसा ही केवळ कला नसून ती आदिवासी समाजाची समृद्ध ओळख आणि एकतेचे प्रतीक आहे. ही संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी असे उपक्रम राबविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मार्गदर्शनातून उपस्थितांना केले. प्रसंगीच, ‘गोंडी ढेमसा’ स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करून त्यांचे व सहभागी स्पर्धकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच आमदार देवराव भोंगळे यांनी आदिवासी समाजाच्या शैक्षणिक सामाजिक आणि संस्कृतीक विकासासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेवटच्या टोकापर्यंत पोचविण्याचा मुद्दा व्यक्त केला तसेच कोरपना येते आदिवासी समाजासाठी भव्य सभागृह उभारण्याच्या दृष्टीने 50 लाख रुपयांचा निधी बाबत पुढाकार घेण्याची गबाई दिली
यावेळी भाजपाचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे, कोरपना तालुकाध्यक्ष संजय मुसळे, तालुका महामंत्री सतीश उपलेंचवार, पुरुषोत्तम भोंगळे, अरुण रागीट, अनु. जमातीचे जिल्हाध्यक्ष अरुण मडावी, शहराध्यक्ष अमोल आसेकर, नगरसेवक किशोर बावणे, सुभाष हरबडे, वर्षा लांडगे, आशा झाडे, रेश्मा मडावी, दिनेश खडसे, उमेश पालीवाल, अबरार अली, सत्यवान घोटेकर, नैनेश आत्राम, प्रमोद कोडापे, मनोज तुमराम, तिरुपती कन्नाके, सचिन कुळमेथे, शशिकांत आडकीने, विनोद कुमरे, अरविंद तुराणकर, पुंडलिक उलमाले, बंडू कुळमेथे, चंद्रभान किन्नाके, विजय पानघाटे, संतोष कोरडे, नागो आत्राम, शंकर चिंचोलकर, उत्तम गेडाम यांचेसह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, आदिवासी बांधव व कोरपना शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



