Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पत्रकार संदीप महाजन यांना झालेल्या मारहाणीचा व्हॉइस ऑफ मीडियाने केला तीव्र निषेध

कारवाईच्या मागणीचे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना झालेल्या मारहाणीचा रोष जिल्ह्यातील पत्रकार व्यक्त करीत असून आज व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांना देण्यात आले.

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना आमदार किशोर पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण व शिवीगाळ केली. पत्रकारांवर केलेल्या हल्ल्याचे कदापि समर्थन करता येणार नाही. पत्रकार महाजन यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा व्हॉइस ऑफ मिडीयाच्या वतीने निषेध करण्यात येत आहे. याप्रकरणाची गंभीर दखल घेऊन आमदार व त्याच्या कार्यकर्त्यांवर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. तसेच दोषींना कडक शासन करण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे व्हॉइस ऑफ मीडियाने केली.
पत्रकार संदीप महाजन यांना न्याय मिळवून देण्याबाबत पूर्ण सहकार्य करावे.

लोकप्रतिनिधींनी संयम बाळगून आपले कर्तव्य बजावणे अपेक्षित आहे. लोकप्रतिनिधींनी शिवीगाळ किंवा अपमानजनक वक्तव्य पत्रकारांशी करू नये, अशी समज आमदार किशोर पाटील यांना आपल्या स्तरावरून दिली जावी, असेही निवेदनात नमूद आहे.
निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात व्हॉइस ऑफ मीडियाच्या पत्रकारांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये