ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन या पत्रकारावर केलेल्या हल्लेखोरांवर कार्यवाही करण्यात यावी

व्हॉइस ऑफ़ मिडिया सावली संघातर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.शेखर प्यारमवार

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन या पत्रकारावर केलेल्या हल्ल्याखोरांवर कार्यवाही बद्द्ल व निषेधार्थ व्हॉइस ऑफ़ मिडिया संघ सावली तर्फे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवदेन देण्यात आले.

पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचे कदापि समपर्ण व्हॉईस ऑफ़ मिडिया संघ समर्थन करनार नाही अश्या भूमिकेने जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्या वर आमदार व त्यांच्या कार्यकर्त्यांवर सदर दोषींवर कड़क योग्य कार्यवाही करण्यात यावी तसेच लोकप्रतिनिधिंनी संयम बाळगुन आपले कर्तव्य बजावणे अपेक्षित आहे,मात्र लोकप्रतिनिधिंनी शिवीगाळ किंवा अपमानजनक वक्तव्य पत्रकारांशी करू नये अशी समज आमदार किशोर पाटिल यांना आपल्या स्तरावरून देण्यात यावी अशी मागणी व्हॉइस ऑफ़ मिडिया संघ सावली तर्फे तहसीलदार परीक्षित पाटिल यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनातून करण्यात आली.

यावेळी व्हॉइस ऑफ़ मिडिया संघाचे जिल्हाध्यक्ष संजय पडोळे, जिल्हा संघटक चंद्रकांत गेडाम, तालुकाध्यक्ष प्रविण झोडे, उपाध्यक्ष प्रा.चंद्रशेखर प्यारमवार,प्रा.विजय गायकवाड़, नासिर अन्सारी,उमेश गोलेपल्लीवार,रूपचंद लाटेलवार, नितिन गोहणे,टिकाराम म्हशाखेत्री,सौरव गोहणे,चंद्रकांत प्रधाने,गिरीश चिमुरकर,सुजित भासारकर,राकेश गोलेपल्लीवार, रंजीता नायडू व अन्य पत्रकार उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये