Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दहशदवादी हल्ल्याप्रसंगी अनुसरावयाची कार्यपध्दीची घेण्यात आली रंगीत तालीम

सदर रंगीत तालिमी करीता एकुण 27 अधिकारी व 135 पोलीस अंमलदार होते उपस्थित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा जिल्हयात अचानक कोणतीही कायदा व सुव्यवस्थेची परीस्थीती उद्धभवली किंवा अराजक तत्वांनी कोणत्याही प्रकारे जनतेमध्ये अफवा पसरवून अघटीत घटना घडवून आणण्याचा प्रयत्न केला तर वर्धा जिल्हा पोलीसांची करावयाची कारवाई, जिल्हा पोलीसांचा प्रतिसाद कसा दिला जातो, संरक्षण सज्जता कशी आहे इत्यादी बाबींचा सखोल अभ्यास करण्याकरीता आज दिनांक 11.08.2023 रोजी वर्धा जिल्हा पोलीसांद्वारे वर्धा रेल्वे स्टेशन येथे मॉक ड्रील (रंगीत तालीम) घेण्यात आली.

यामध्ये पोलीस दलासोबतच जनतेमध्ये अचानक उद्भवलेल्या तणावाचे काय प्रतिसाद उमटतात. त्यांच्या प्रतिसादावर पोलीसांनी कोणते उपाय योजले पाहिजे या सर्व बाबींचा सुध्दा अभ्यास करून निदर्शने नोंदविण्यात आलेली आहेत.

या रंगीत तालीमीदरम्यान एका बॅगमध्ये कोणीतरी अज्ञात दशहतवाद्याने काही वेळापूर्वीच आर.डी.क्स. नावाचे स्फोटके रेल्वे स्टेशनच्या तिकीट घराजवळ ठेवले आहे व त्यापासून कायदा व सुव्यवस्थेला धोका असल्याची माहिती पोलीसांना देण्यात आली. माहिती मिळताच जि.आर.पी. वर्धा, आर.पी.एफ. वर्धा, बॉम्ब शोधक व नाशक पथक, वर्धा, पो.स्टे. वर्धा शहर, रामनगर, सावंगी, अपर पोलीस अधिक्षक डॉ. श्री. सागर रतनकुमार कवडे, वाहतूक शाखा. एस. आय.डी., जिल्हा विशेष शाखा, आर. सी. बी. पथक. क्यू. आर. टी. पथक, दहशतवाद विरोधी पथक, वर्धा, ए.टी.एस. नागपूर, अग्नीशामक दल, सामान्य रूग्णालय, वर्धा यांची पथके माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाली.

सदर कारवाई दुपारी 04.30 वा. पासून संध्याकाळी 06.00 वा. पर्यंत करण्यात आली. त्या दरम्यान स्फोटकांची तपासणी, नागरीकांमध्ये शांतता टिकवून ठेवणे, कोणतीही गोंधळाची स्थीती न उद्धभवू देणे याकरीता कसोशीने प्रयत्न करून, तालमीतील दहशतवादी याचा शोध घेवून त्यास ताब्यात घेण्यात आले. सदर रंगीत तालिमी करीता एकुण 27 अधिकारी व 135 पोलीस अंमलदार उपस्थीत होते.

सदरच्या कारवाईचे प्रयोजन मा. पोलीस अधिक्षक, वर्धा श्री नूरूल हसन यांनी आखलेले असून याबाबत इतर कोणत्याही अधिकारी व कर्मचारी यांना माहिती नसतांना सुध्दा वर्धा पोलीसांतर्फे व इतर विभागांतर्फे अतिशय प्रभावी कारवाई करण्यात आली. याबाबत मा. पोलीस अधिक्षक यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे. तसेच वर्धा शहरातील जनतेने या कारवाईबाबत कोणत्याही अफवेला बळी पडू नये व शांतता राखावी, असे आवाहन केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये