ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

“गांजा अंमली पदार्थांची विक्री करणा-या गुन्हेगारांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही”

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

  वर्धा पोलीस अधीक्षक मा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणारे गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेस आदेशीत केल्याने, त्या अनुषंगाने अंमली पदार्थांची विक्री करणा-या गुन्हेगारांवर कारवाई करण्याची स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहिम राबविली असुन, दि. 01 नोव्हेंबर 2026 रोजी स्था.गु.शा. वर्धा चे पथकाने मुखबीरतर्फे मिळालेल्या खात्रीशीर खबरेवरून पो.स्टे. सेलु हद्यीतील मौजा केळझर, यशवंत प्राथमिक शाळेमागे आरोपी प्रभाकर बंडु पवार व त्याचा भाऊ गजानन बंडु पवार यांचे राहते घरी रेड केला असता, तेथे ते दोघेही हजर मिळुन आले असुन, घरझडतीदरम्यान गांजा अंमली पदार्थ मिळुन आला. सदर गांजाचा माल हा त्यांचे दोघांचे मालकिचा असुन, ते दोघेही गांजाविक्रीचा अवैध व्यवसाय करीत असुन, सदर गांजाचा माल हा त्यांनी आरोपी व्यंकट भाऊराव मोहिते व जनाबाई मोहिते दोन्ही रा. शिवनगर वर्धा यांचेकडुन खरेदी केला. तरी नमुद 04 हि आरोपी हे संगणमताने गांजा मालाची तस्करी करून विक्रीचा अवैध व्यवसाय करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने, जागीचं जप्ती पंचनामा कार्यवाही करून आरोपीचे ताब्यातुन 02 किलो 385 ग्रॅम गांजा अमली पदार्थ जु.कि. 1,19,250 रू चा मुद्देमाल जप्त करून, चारही आरोपीतांविरूध्द पो.स्टे. सेलु येथे एन.डि.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

  सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, यांचे निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी, स.पो.नि. आशिषसिंग ठाकुर, पो.अं अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, सागर भोसले, रवि पुरोहित सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये