ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या शहरातील परिषदेच्या शाळा उभारण्यात याव्या – आप शहराध्यक्ष सुरज शहा

आमदार धानोरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

वरोरा – भद्रावती विधानसभेच्या आमदार मा. प्रतिभाताई धानोरकर यांची भेट घेऊन स्थानिक भद्रावती नगरपरिषद ची स्थापना सन 1997 या वर्षी झाली असून, त्यानंतर पासूनच भद्रावतीच्या जनतेकडून शिक्षण कर घेण्याची सुरुवात झाली. शिक्षण कर देऊनही सुद्धा भद्रावती मधे नगरपरिषद च्या एकही शाळा उभारण्यात आलेल्या नाही. लोकांना ही वाटू लागलं आहे की ज्याप्रमाणे आम्ही नगरपरिषद ला शिक्षण कर देतो त्याचप्रमाणे नगरपरिषद तर्फे सुद्धा आम्हाला शाळा मिळावी पण असे काही होत दिसत नाही. ज्या प्रमाणे दिल्लीमध्ये आधुनिक व दर्जेदार शाळांची निर्मिती झालेली आहे, त्याचप्रमाणे भद्रावती मधे सुद्धा आधुनिक व दर्जेदार शाळेची निर्मिती झाली पाहिजेत. प्रत्येक प्रभाग मधे दर्जेदार प्रथमीक शाळेची उभारणी झाली पाहिजे व भद्रावती शहरात किमान 2 माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची उभारणी झाली पाहिजे व इथल्या गोरगरीब जनतेच्या मुलांना व मुलींना दर्जेदार शिक्षणाचा लाभ मिळाला पाहिजेत. जर असे होत नसेल तर जनतेकडून शिक्षण कर घेणे बंद करावे

अशी मागणी आम आदमी पार्टी भद्रावती चे शहराध्यक्ष सुरज शहा यांच्याकडून निवेदनाद्वारे करण्यात आले. यावेळी निवेदन देताना आम आदमी पार्टी भद्रावती चे शहराध्यक्ष सुरज शाहा, शहर उपाध्यक्ष सुमित हस्तक, शहर उपाध्यक्ष आशिष तांडेकर, शहर संघटन मंत्री अनिल कुमार राम, शहर सचिव विजय सपकाळ, शहर कोषाध्यक्ष सरताज शेख, शहर महिला अध्यक्ष प्रतिभाताई कडूकर, महिला कोषाध्यक्ष रेखा गेडाम, शहर सदस्य मंगेश भाऊ खंडाळे, डोलारा प्रभाग प्रमुख केशवभाऊ पचारे, युवा सचिव अतुल रोडगे उपस्तीथ होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये