ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पवनारच्या विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांबविण्याची मागणी

भीम टायगर सेनेचा आंदोलनाचा इशारा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा : पवनार येथील विद्यार्थ्यांना एसटी बसचे चालक व वाहक बस थांबवत नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या समस्येकडे एसटी महामंडळाचे लक्ष वेधण्यासाठी विशाल नगराळे यांच्या नेतृत्वात आज विद्यार्थ्यांसह वर्धा बसस्थानक प्रमुखांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले.

पवनार येथील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी एसटी बसने प्रवास करतात. मात्र, बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनातून निदर्शनास आणून देण्यात आले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी संबंधित एसटी बस चालक व वाहकांना पवनार येथे बस थांबविण्याबाबत योग्य सूचना द्याव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या समस्येची तातडीने दखल घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा यापेक्षाही मोठे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा विशाल रामटेके, विशाल नगराळे तसेच भीम टायगर सेनेच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी दिला. आता एसटी प्रशासन या निवेदनाची कितपत दखल घेते आणि विद्यार्थ्यांची समस्या कधी मार्गी लागते, याकडे पवनारमधील विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले आहे.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते राकेश पांडे, अमित पन्नासे, अमित गजभिये, आकाश वासेकर, रोशन वासेकर, उपस्तित होतें

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये