ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शुल्लक कारणावरून युवकाचा खून

मूल तालुक्यातील हळदी येथील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मंगेश पोटवार

             घराशेजारील केबल बाजूला कर, असे म्हटल्याप्रकरणी रागाच्या भरात बाप, लेकाने घराशेजारील युवकाचा कुऱ्हाडीने निर्घृण खून केला. हि हृदयद्रावक घटना तालुक्यातील हळदी येथे सकाळी 10.00 वाजता घडली. मृतकाचे नाव राजू शेषराव बोदलकर (वय 30 वर्ष आहे.

         घराशेजारी असलेल्या झाडाचे फांद्या तोडल्यानंतर लागूनच असलेला केबल बाजूला कर, असा प्रेमाने सांगणाऱ्या घराशेजारील युवकावर सूरज गुरुदास पिपरे (वय 21),आणि गुरुदास नक्तू पिपरे या बाप लेकाने कुऱ्हाडीने वार करून राजू शेषराव बोदलकर या युवकाचा निर्घृण खून केला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मृतक हा अत्यंत शांत व संयमी स्वभावाचा होता. मृत्युपश्चात त्याला एक मुलगा,एक मुलगी व पत्नी आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये