Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मालमत्ता करात ५ टक्के सुटचा लाभ घ्या ३१ डिसेंबरपर्यंत

करभरणा प्रत्यक्ष कार्यालयात अथवा दिलेल्या लिंकवर कराचा ऑनलाईन भरणा करावा - मनपाचे आवाहन

चांदा ब्लास्ट

नियमित मालमत्ता कर भरणा करणाऱ्यांकरीता प्रोत्साहन म्हणुन ३१ डिसेंबरपर्यंत मालमत्ता कराचा एकमुस्त भरणा केल्यास चालू आर्थिक वर्षासाठी ५ टक्के सूट देण्याची योजना मनपातर्फे जाहीर करण्यात आली आहे.

    मालमत्ता कर हे मनपाच्या उत्पन्नाच्या प्रमुख स्रोतांपैकी एक आहे. शहरासाठी नियमित सोयी सुविधा पुरविण्यास मालमत्ता कराची अधिकाधिक वसुली होणे गरजेचे आहे. महापालिका क्षेत्रात जवळपास ८० हजार मालमत्ता असून, संपूर्ण मालमत्तांच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे मागणी नोंदवली जाते. करदात्यांना कराची नोटीस पाठवून कर भरणा करण्यासाठी विनंती करणे ही कर विभागाची पहिली प्रक्रिया मानली जाते. जास्तीत जास्त वसुली होऊन ती शहराच्या विकास कामांसाठी उपयोगी यावी या अनुषंगाने करवसुलीस प्राधान्य दिले जाते.

     करभरणा हा प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन अथवा https://chandrapurmc.org या लिंकवर मालमत्ता कराचा ऑनलाईन भरणा करता येणे शक्य आहे तसेच ऑनलाइन युपीआय ॲप अर्थात फोन पे, गुगल पे,भीम ॲप ( भारत इंटरफेस फॉर मनी ) यांचाही पर्याय मनपाने उपलब्ध करून दिलेला आहे.
मालमत्ता व पाणी करात देण्यात येत असलेली सुट ही औद्योगीक मालमत्तेस लागु राहणार नाही.एकुण मालमत्ता व पाणी करात सदर सुट देण्यात येत असल्याने मालमत्ता कर त्वरित भरण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये