ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक श्री.सदाशिव वाघमारे यांचे मार्गदर्शनात पुलगाव शहरात वाहतूक शाखेची विशेष मोहीम.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. वंदना कारखेले व पोलीस निरीक्षक सदाशिव ढाकणे पो.स्टे. पुलगांव यांचे उपस्थितीत वाहतुक नियंत्रण शाखा, वर्धा चे प्रभारी अधिकारी विजयकुमार घुले व अंमलदार तसेच पोलीस स्टेशन पुलगांव चे अधिकारी व अंमलदार यांनी पुलगांव शहरातील वाहतुक व्यवस्था सुरळीत राहावी तसेच वाहन चालक व पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच अपघात रोखण्यासाठी रस्त्यांवर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा स्थितीत उभी करण्यात आलेल्या वाहनांवर तसेच विना परवाना वाहन चालविणारे वाहन चालक, ट्रिपलसिट, कर्णकर्कश आवाजाचे सायलेंसर असलेले वाहन, परवाना न बाळगणारे, फॅन्सी नंबर प्लेट असलेले वाहनांवर पुलगांव शहरात विशेष मोहीम आज दिनांक 21/09/2026 रोजी घेऊन मोटार वाहन कायद्यांन्वये कारवाई करण्यात आली.

या कारवाई दरम्यान सार्वजनिक रस्त्यांवर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल या पध्दतीने वाहने उभी करणारे वाहन चालकांवर कलम 122 अन्वये 50 केसेस, अल्पवयीन चालक व विना परवाना वाहन चालविणारे चालक यांच्यावर कलम 3/181 व 4/181 मोवाका अन्वये 21 केसेस, व ईतर कलमान्वये 59 केसेस करण्यात आल्या अशा एकुण 128 केससे मोवाका अन्वये करण्यात आल्या व 1,66,550 / रु चा दंड करण्यात आला.

तसेच वर्धा जिल्हा पोलीस व जिल्हा वाहतुक नियंत्रण शाखा, वर्धा चे वतीने पुलगांव शहरातील नागरीकांना आवाहन करण्यात आले.

विशेषतः –

1) वाहतुकीच्या मार्गावर वाहने उभी करु नये.

2) सार्वजनिक ठिकाणी रस्त्यांवर व गर्दीच्या ठिकाणी वाहने अनधिकृत पार्कीग करु नये.

3) पाकींगच्या ठिकाणीच वाहने उभी करावीत.

4) अल्पवयीन मुला मुलींना वाहने चालविण्यास देऊ नये.

5) विना परवाना वाहन चालवु नये.

6) महामार्गावर दुचाकी वाहने चालवितांना हेल्मेटचा वापर करावा.

7) चारचाकी वाहन चालकांनी सिटबेल्टचा वापर करावा.

8) ट्रिपलसिट, कर्णकर्कश आवाजाचे सायलेंसर असलेले वाहन चालवु नये.

सदर मोटार वाहन कायद्यांन्वये करण्यात येणारे कारवाईचा उद्देश हा दंड वसुल करण्याचा नसुन वाहन चालकांना शिस्त लावण्याकरीता तसेच सर्व नागरीकांचे सुरक्षित प्रवासाकरीता असुन नागरीकांच्या सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य देण्यात येत आहे. लहान मुलांकडून विनापरवाना वाहन चालवुन घडत असलेले अपघात व त्यामुळे त्यांचे भविष्यावर होणोरे वाईट परीणामांपासुन त्यांचे संरक्षण व नागरीकांचे जिवीताचे संरक्षण हा प्रमुख उद्देश्य आहे.

यापुढेही प्रभावी पणे राबविण्यात येणार आहे. तरी वर्धा जिल्हा वाहतुक पोलीस विभागाकडून जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन आहे कि आपले वाहन चालवितांना वाहतुक नियमांचे पालन करावे.

(विजय कुमार घुले ) स.पो.नि/वा.नि.शा.वर्धा

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये