ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गुंतवणुक केलेल्या रक्कमेवर परतावा देण्याचे आमीष दाखवुन फसवणूक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 आर्थिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी पोलीस स्टेशन देवळी येथील अपराध क्रमांक 0719/2024 कलम 316(2), 316(5), 318(4), 3(5) BNS सहकलम 3, 4 MPID ACT मधील निष्पन्न आरोपी पुष्पक किशोर पटले रा. तिरोडा जि. गोंदीया यास अटक करुन 7,80,000/- रु. चा मुद्देमाल केला जप्त.

हकीकत याप्रमाणे आहे की, यातील फिर्यादी व इतर यांना आरोपीने त्यांचे PVR मल्टीट्रेडींग लॅब, आर्वी नाका, वर्धा या फर्म च्या माध्यमातुन ट्रेडींग केल्यास गुंतवणुक केलेल्या रक्कमेवर परतावा देण्याचे आमीष दाखवुन फिर्यादी व ईतर लोकांकडुन रक्कम स्विकारुन त्याबाबचे हमीपत्र लिहून देवुन विश्वास संपादन केला तसेच गुंतवणुक केलेल्या रक्कमेवर सुरुवातीला मोबदला देवून नंतर परतावा देण्याकरीता टाळाटाळ करुन फिर्यादी व इतर साक्षदारांची एकुण 62,02,000/- रु. ची फसवणुक केली. दिनांक 08-08-2024 रोजी फिर्यादीचे लेखी रिपोर्ट वरुन सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला. तपासादरम्यान गुंतवणुकदारांची फसवणुकीची रक्कम ही 1,07,50,000/- रु एवढी निष्पन्न झाली असुन गुन्ह्यात पुर्वीच 93,06,646/- रु चा माल जप्त करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचे तपासातील PVR मल्टीट्रेडींग लॅब, या फर्मचा संचालक मुख्य आरोपी विक्रम ज्ञानेश्वर पर्बत रा. बोरगांव मेघे वर्धा यास दिनांक 19-08-2025 रोजी अटक करण्यात आली असुन आरोपी हा वर्धा कारागृह न्यायालयीन कोटळीत आहे.

तसेच आरोपी विक्रम पर्बत याचा गुन्ह्यातील साथीदार पुष्पक पटले रा. तिरोडा गोंदीया हा बरेच वर्षा पासुन आपली ओळख लपवुन बाहेर राज्यात राहुल वर्मा या नावाने वास्तव्यास राहुन पोलीसांकडुन आपली अटक चुकवुन फरार होता. त्यास तांत्रीक पध्दीतीने पुणे, छत्तीसगड रुट पॅटर्नचा अभ्यास करुन शोध घेवुन ऐकता नगर, पुरानी भिलाई 3, जि- दुर्ग राज्य छत्तीसगड येथुन ताब्यात घेवुन गुन्हयात दि. 17.09.2026 रोजी अटक करुन त्याचा दि. 17.09.2026 ते दि. 21-09-2026 पावेतो PCR घेण्यात आला. त्याचेकडुन 1) महिंद्र XUV 500 कार क्र. एम.एच 32 सी 7721 कि. 7,00,000/- 2) एक अॅप्पल कंपनीचा 14 प्रो. मॅक्स मोबाईल कि. 40,000/- रू 3) HP कंपनीचे 02 लॅप टॉप कि. 40,000/- रू असा एकुण 7,80,000/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक, श्री. सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे व पोलीस उप अधीक्षक श्री. प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनात सहा. पोलीस निरीक्षक श्री. निशांत फुलेकर, व स्टाफ पो.ह. वा निकेश गुजर, कुणाल डांगे, राजेश पाचरे, पो-कों अंकित जिभे यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये