शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरीवरील मोटारपंप चोरणाऱ्या टोळीचा सावंगी पोलीसांनी शोध घेवून केली अटकेची कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पोलीस स्टेशन सावंगी मेघे हद्दीतील शेतशिवारामध्ये हल्लीच्या काळात शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरीवरील मोटारपंप चोरीच्या घटनेमध्ये वाढ होत असून फिर्यादी राजेंद्र गोविंदराव डायगव्हाणे रा पडेगाव यांनी पोलीस स्टेशनला तकार दिली की दि. 16/09/2026 चे 18.00 वा ते दि. 17/09/2026 चे 07:00 वा दरम्यान. त्यांचे शेतातील एक सिलव्हर कंपनीची 5 एच.पी. मोटार व केबल, तसेच त्यांचे शेतशेजारी दिलीप शामराव मसराम रा. पडेगाव यांचे शेतातील एक किर्लोस्कर कंपनीची 3 एच.पी. मोटार व केबल, तसेच शेतशेजारी सुनिल पुरुषोत्तम रेवतकर एक टरगो कंपनीची 3 एच.पी. मोटार व केबल असा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेला, अशा फिर्यादी यांचे तोंडी रिपोर्ट वरून पोस्टे ला अप.क. 724/26 कलम ७०3 (2) वीएनएरा प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. तसेच या अगोदर सुध्दा एक महिन्याचे कालावधीत सेलसुरा रोडवरील चंद्रकांत भैयाजी भारती रा देवळी, यांचे शेतातील विहिरीचे पाण्यातील 1 मोटार, वडद रोडवरील मोरेश्वर ज्ञानेश्वर वडतकर व प्रज्वल वासुदेव डफरे यांचे शेतातील 1 मोटार व नागठाणा शिवारातील स्वप्नील खुशालराव झाडे रा. वंजारी चौक वर्धा यांचे शेतातील 1 मोटार अशा 4 मोटारपंप गेल्या होत्या. पो. स्टे हद्दीमध्ये शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरीवरील मोटारपंप चोरीच्या घटनेमध्ये वाढ होत असल्याने सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून पो.नि. विनोद गिरी सा. ठाणेदार पो.स्टे. सावंगी यांनी पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक यांना मार्गदर्शन करून गुन्हयातील चोरीस गेलेला मुद्देमाल व अज्ञात आरोपीचे शोधकामी रवाना केले असता मुखबीरकडून विधिसंघर्षीत बालक याचा सदर चोरीमध्ये सहभाग असल्याची गुप्त माहिती मिळाली, त्याआधारे सदर विधिसंघर्षीत विधिसं बालक याचा शोध घेवून त्यास विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्याने त्याचे मित्र ओम पठाडे रा. सालोड टि पॉइंट, सम्यक भरणे रा. देवळी, किष्णा राउत रा. आगरगाव, जितेंद्र कांबळे रा. आगरगाव, आशिष आत्राम रा. धोत्रा रेल्वे यांचे मदतीने सदर शेतातील मोटारपंप चोरी केल्याचे सांगीतल्याने आरोपी नामे 1) ओम दिगांबर पठाडे वय 22 वर्ष रा. सालोड हिरापुर, जि. वर्धा. 2) सम्यक दिपचंद भरणे वय 19 वर्ष रा. देवळी, जि. वर्धा 3) कुणाल उर्फ किष्णा राजेंद्र राउत वंय 19 वर्ष रा. आगरगाव, ता. देवळी जि. वर्धा. 4) जितेंद्र गरीबरावजी कांबळे वय 28 वर्ष रा. आगरगाव, ता.देवळी जि. वर्धा. 5) आशिष अनंता आत्राम वय 19 वर्ष रा. धोत्रा रेल्वे, ता.जि. वर्धा यांचा शोध घेवून त्यांना गुन्हयामध्ये अटक करून त्यांचा न्यायालयाकडून पी.सी.आर. घेवून त्यांना विचारपुस केली असता त्यांनी चोरी केलेल्या मोटारी राजिव नगर सांवगी येथे राहणारा भंगार विक्रेता गोविंद गदई यास विकल्याचे सांगीतले. तसेच आरोपीतांनी दि. 13.09.26 ते 14.09.26 चे रात्र दरम्यान सावंगी मेडीकल चौक ते सावंगी दवाखाना रोडवरील सिमेंटरोड बांधकामाचे मशीनचा केबल सुध्दा चोरी केल्याबाबत कबूली दिली असून त्याबाबत पो.स्टे. ला अप.क. 722/26 कलम 303 (2) बीएनएस प्रमाणे गुन्हा नोंद असून गुन्हयातील चोरी केलेला केबल आरोपीतांनी जाळून त्याचं तांबे वेगळे काढून एका ठिकाणी लपवून ठेवलेला आहे असे सांगीतल्याने व आरोपीने तो दाखवून दिल्याने मेमोरंडम पंचनाम्यानुसार तांब्याचा तार वजन 5 किलो किं. 7500/रू. चा आरोपीकडून जप्त करण्यात आले आहे. तसेच सदर भंगार विक्रेता याचे कडून सदर गुन्हयातील 1) एक सिलव्हर कंपनीची 5 एच.पी. मोटार किं. 9,000/ रु. 2) एक किर्लोस्कर कंपनीची 3 एच. पी. मोटार किं. 4000/रू 3) एक टरगो कंपनीची 3 एच.पी. मोटार किं. 7000/ रू., तसेच मौजा वडद,
सेलसुरा, नागठाणा शिवारातील चोरी केलेल्या 4) एकुण 4 मोटारी भंगार विकेता याने तोडून फोडून त्याचे पार्ट वेगवेगळे केलेले किं. 10,000/ रू. तसेच आरोपीतांनी गुन्हा करतेवेळी वापरलेले वाहन 5) हिरो होंड स्प्लेंडर मोसा क. एमएच 31 बीवाय 3700 किं. 50,000/रू. 6) होंडा शाईन मो.सा.क. एम.एच 32 ए.डब्लू 3639 किं. 80.000/ रू. 7) एक ओप्पो कंपनीचा मोबाईल किं 10,000 रू. 8) एक पोको कंपनीचा अॅन्ड्रॉइड मोबाईल किं. 10,000/रू. 9) एक किपॅडचा मोबाईल किं. 1500/रू. 10) केबल जाळून त्यातून काढलेला तांब्याचा तार किं. 15,000/ रू. असा एकुण जुकि 2,04,000/रू चा माल. जप्त करून पो.स्टे. सावंगी मेघे येथील दोन गुन्हे उघडकीस आणलेले आहे.
सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधीक्षक श्री सौरभकुमार अग्रवाल साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री सदाशिव वाघमारे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनिल महाडीक साहेब, यांचे मार्गदर्शनात पो.नि. श्री विनोद गिरी सा, ठाणेदार, पो.स्टे. सांवगी पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय पंचभाई, विरेंद्र कांबळे, अनिल वैद्य, निखील फुटाणे, हर्षवर्धन मून, अमोल जाधव, यांनी केली असून पुढील तपास पोहवा संजय पंचभाई हे करीत आहेत.



