ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पाचगावातील अवैध दारू विक्री तात्काळ बंद करा. 

सभापती तिरूपती इंदुरबार यांची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मागणी ; नियमित गस्त व कठोर कारवाईची मागणी. 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

राजुरा :_ तालुक्यातील मौजा पाचगाव येथे अवैध दारू विक्रीला उधाण आला असून यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. येथील सामाजिक वातावरण दिवसेंदिवस बिघडत आहे. त्यामुळे येथील अवैध दारू विक्री तात्काळ बंद करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समिती, राजुराचे सभापती श्री. तिरूपती मलय्याजी इंदुरबार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

           पाचगाव परिसरात काही व्यक्तींकडून अवैधरीत्या दारूची विक्री होत असल्याने गावातील सामाजिक वातावरणावर विपरीत परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. विशेषतः युवकांमध्ये व्यसनाधीनता वाढत असल्याने त्यांच्या आरोग्यावर, कौटुंबिक जीवनावर तसेच सामाजिक भवितव्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

           निवेदनानुसार, २० सप्टेंबर २०२६ रोजी कैलास संतोष तोडेतिवार (वय २१), रा. पाचगाव, या युवकाने दारूच्या नशेत विष प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडल्याचे नमूद करण्यात आले आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तातडीने दखल घेऊन संबंधित पोलीस अधिकारी तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाला आवश्यक निर्देश द्यावेत आणि भविष्यात अशा प्रकारची अवैध दारू विक्री होणार नाही, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी विनंती सभापती तिरूपती इंदुरबार यांनी केली आहे. निवेदनाची प्रत अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, चंद्रपूर यांनाही देण्यात आली असून आवश्यक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

       यावेळी खासदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना सदर प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच अवैध दारूची विक्री, साठवणूक व वाहतूक रोखण्यासाठी नियमित पोलीस गस्त वाढवून प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशा सुचना केल्या आहेत.

          यावेळी खासदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, महिला जिल्हाध्यक्ष ॲड. कुंदाताई जेनेकर, राजुरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, शहराध्यक्ष हरजीतसिंग संधू, नगरसेवक एजाज अहमद, न प सभापती पूनम गिरसावळे, अन्नुताई संधु, नगरसेविका इंदुबाई निकोडे, मंगला मोकडे, पोर्णिमा सोयाम, सुमित्राबाई कुचनकर, संघपाल देठे, कुणाल मोकळे यासह राजुरा काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये