ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शासकीय शाळांमध्ये उत्तम दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यावर भर – पालकमंत्री डॉ.पंकज भोयर

नगरपरिषदेच्या पाच शाळांच्या नुतणीकरणाचे लोकार्पण ; सेवा संकल्प अभियानांतर्गत शाळा लोकार्पणाचा उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा :_ नगर परिषदेच्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या शाळा खाजगी शाळांच्या स्पर्धेत पट संख्येअभावी कमी होत आहे. शैक्षणिक क्षेत्रात सुरु असलेल्या स्पर्धेत शासकीय शाळांना टीकून ठेवण्यासाठी या शाळांचा शैक्षणिक दर्जा व आवश्यक सोईसुविधा निर्माण करुन देण्यावर भर असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त दि.17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोंबर यादरम्यान सेवा संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानानिमित्त आज नगर परिषदेच्यावतीने चालविण्यात येत असलेल्या आणि अनेक वर्षापासून जून्या झालेल्या प्राथमिक शाळांच्या इमारतीचे वैशिष्टपुर्ण निधी व दलितेत्तर निधी अंतर्गत नुतणीकरणाचे बांधकाम करण्यात आले. त्याच्या लोकार्पण प्रसंगी पालकमंत्री बोलत होते.

कार्यक्रमाला खासदार मायाताई इवनाते, नगर परिषद अध्यक्ष सुधीर पांगुळ, उपाध्यक्ष प्रदिपसिंह ठाकुर, बांधकाम सभापती राखी पांडे, शिक्षण सभापती प्रियंका खंगार, गटनेते विलास आगे, नगरसेवक वंदना मुडे, शिक्षण प्रशासन अधिकारी उषा तळवेकर, उपमुख्याधिकारी अभिजित मोटघरे आदी उपस्थित होते.

खाजगी शाळांमध्ये मिळत असलेल्या सोईसुविधांमुळे विद्यार्थ्यांचा कल या शाळांकडे वाढलेला आहे. यासाठी शासकीय शाळांची गुणवत्ता कशी वाढविता येईल? यावर शासनाचा भर असून डिजिटल शिक्षणाच्या सुविधा, अत्याधुनिक आवश्यक सोईसुविधा निर्माण करुन देण्यासोबतच विद्यार्थ्यांसाठी नवोपक्रम राबविण्याचा माणस असल्याचे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर म्हणाले. शहरातील काही मागास परिसरात असलेल्या शाळा डिजिटल शाळा बनविण्यात येणार असून विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी क्रीडांगण सुध्दा तयार करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर म्हणाले.

आजच्या स्पर्धेच्या युगात टीकून राहण्यासाठी शिक्षण फार महत्वाचे आहे. हे महत्व जाणून शासनाच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबविण्यासोबतच शाळांचा विकास करण्यावर भर दिला जात आहे. शासकीय शाळांमधून शिक्षण घेतलेले विद्यार्थी आज मोठ्या पदावर काम करीत आहे. पालकांनी अशा विद्यार्थ्यांचे अवलोकन करुन आपल्या पाल्यांना शासकीय शाळेत दाखल करावे, असे आवाहन खासदार मायाताई इवनाते यांनी केले.

केवळ शाळांचे बांधकाम करुन चालणार नाही, यासाठी शाळा समितींनी सुध्दा पुढाकार घेऊन शाळांच्या देखभाल दुरुस्तीकडे लक्षण देण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांचे प्रयत्न आवश्यक आहे. शिक्षणाची गंगा अविरत सुरु राहण्यासाठी ज्ञानाचा वसा घेतला पाहिजे, असे सुधीर पांगुळ म्हणाले. शिक्षण सभापती प्रियंका खंगार यांनी पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने नगरपरिषद शाळांचे स्वरुप बदलत आहे. आता या शाळांमध्ये चांगल्या शैक्षणिक सुविधा निर्माण झाल्याने शाळांची पटसंख्या वाढेल. खाजगी शाळेप्रमाणेच येथे देखील शिक्षण उपलब्ध होईल, असे सांगितले.

तत्पूवी पालकमंत्री डॉ.भोयर यांनी वसंत प्राथमिक शाळा, स्वामी विवेकानंद व मोतीलाल नेहरु प्राथमिक शाळा, लाला लजपतराय उच्च प्राथमिक शाळा, शिवाजी व सिंधी हिंदी प्राथमिक शाळा व महाराणा प्रताप प्राथमिक शाळा येथे जाऊन नुतनीकरण कामांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी बांधकाम व नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये