ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलीस स्टेशन हिंगणघाट हद्दीतील चार सराईत गुन्हेगार वर्धा जिल्हयातुन हद्दपार

अनिल राऊत पोलीस निरिक्षक पोलीस स्टेशन हिंगणघाट यांनी केलेली कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस स्टेशन हिंगणघाट हद्दीतील कायदा व सुव्यवस्था बाधित होवु नये तसेच शहरात वाढणारे अपराधावर अंकुश बसावा हा मानस मनात बाळगुन पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील ठाणेदार अनिल राउत यांनी हिंगणघाट शहरातील संघटीतपणे अवैद्य दारूविकी व शरीराविरुध्दचे गुन्हे करणारे सराईत गुन्हेगार 1) आकाश उर्फ निंबु अमर तेलतुंबडे, वय 26 वर्षे, 2) जगदिश अमर तेलतुंबडे, वय 29 वर्षे, 3) अजय ज्ञानेश्वर मातकर, वय 47 वर्षे, सर्व रा. संत चोखोबा वार्ड, हिंगणघाट यांचे विरुध्द कलम 55 म.पो.का. अन्वये प्रस्ताव तयार करून मा. उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट श्री सुशिलकुमार नायक यांचे मार्फतीने मंजुरी करीता मा. पोलीस अधिक्षक साहेब, वर्धा यांचे कडे पाठविण्यात आलेला होता. सदर प्रस्तावावरून पोलीस अधिक्षक, वर्धा श्री सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिनांक 17/09/2026 रोजी सदर प्रस्ताव मंजुर करून तिन्ही गुन्हेगारांना वर्धा जिल्हयातुन दोन वर्षा करीता हद्द‌पार आदेश पारीत केलेले आहेत. तसेच अंमली पदार्थ विक्री अवैद्य दारू विक्री व महिला विरूध्द गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार सुजित अशोकराव गावंडे, रा. संत कबिर वार्ड, हिंगणघाट याचे विरूध्द कलम 56 म.पो.का. अन्वये प्रस्ताव तयार करून मा. उपविभागीय अधिकारी, हिंगणघाट यांचे कडे मंजुरी करीता पाठविलेला होता. सदर प्रस्ताव उपविभागीय अधिकारी, हिंगणघाट यांनी दिनांक 17/09/2026 रोजी सदर प्रस्ताव मंजुर करून नमुद गुन्हेगारास वर्धा जिल्हयातुन सात दिवसाकरीता हद्द‌पार आदेश पारीत केलेला आहे. हिंगणघाट शहरातील असे एकुण चार सराईत गुन्हेगार वर्धा जिल्हयातुन ह‌द्दपार झाले आहेत. या कारवाई मुळे हिंगणघाट शहरातील ईतर सराईत गुन्हेगारांचे धाबे दणानले असुन आगामी काळात हिंगणघाट शहरात होणारे सण उत्सवादरम्याण शांतता राखण्यास मदत होणार आहे.

सदर कारवाई हि अपर पोलीस अधिक्षक श्री सदाशिव वाघमारे वर्धा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुशिलकुमार नायक हिंगणघाट यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील ठाणेदार श्री अनिल राउत यांनी पो. स्टे. चे पो.हवा. प्रविण देशमुख, पो.अं. संग्राम मुंडे, शिवशंकर यादव, संतोष लोहटे यांचे मदतीने केलेली आहे. पोलीस निरिक्षक अनिल राऊत पो. स्टे. हिंगणघाट, जि. वर्धा.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये