ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नंदोरी येथे सेवा संकल्प अभियानाचा व स्वच्छता ही सेवाचा तालुकास्तरीय शुभारंभ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

                पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या वतीने नंदोरी येथे शासनाच्या सेवा संकल्प अभियानाचा व स्वच्छता ही सेवा या पंधरवाड्याच्या तालुकास्तरीय शुभारंभ स्वच्छता अभियान राबवून व सेवा संकल्प अभियानाचा ग्रामसभा घेऊन करण्यात आला.

 या कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समितीचे सहा.गटविकास अधिकारी डॉ.बंडू आकनुरवार यांनी केले. अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत प्रशासक मंगेश भोयर होते.प्रमुख अतिथी नरेंद्र जीवतोडे,गटशिक्षणाधिकारी डाॅ.प्रकाश महाकाळकर,विस्तार अधिकारी प्रमोद ढोरे,महेश मिलमिले,तंटामुक्ती अध्यक्ष आशुतोष घाटे, गाव स्वच्छता मोहीमअध्यक्ष प्रशांत लांबट,ग्राप्रअधिकारी अश्विन पेटकर,उमेदचे अरुण चौधरी,मंगेश विरुटकर,रितेश हरणे, दीपक अहिरकर, प्रभागसंघ अध्यक्ष सौ वर्षा प्रताप भोयर,भारती महादेव कुरेकर होते.गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ यांचे मार्गदर्शनात कार्यक्रम घेण्यात आला.सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व गाडगेबाबाच्या प्रतिमेला मालार्पण व दिव्पप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले.प्रथम स्वच्छता ही नंदोरी येथे बसस्टँड पासून सार्वजनिक वाचनालय,जिप शाळा व ग्रामपंचायत पर्यंतच्या रस्त्याची व परिसर स्वच्छता करून ग्रामपंचायत समोर सेवा संकल्प अभियानाची ग्रामसभा घेण्यात येऊन सेवा संकल्प अभियानाची उद्दिष्टे व पस व ग्रामपंचायतीकडून देण्यात येणार्या सेवाची, सेवा संकल्प अभियान व स्वच्छता ही सेवा संदर्भात नव,अकरा व सोळा सप्टेंबरच्या शासन निर्णयाची माहीती देण्यात आली.यावेळी सहा.गटविकास अधिकारी डॉ.बंडुआकनुरवार यांनी सेवा संकल्प अभियानाच्या कालावधीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत विविध उपक्रमाचे नियोजन करून उपक्रम राबविण्या बाबत,प्रशासक मंगेश भोयर व नरेंद्र जिवतोडे,डाॅ.प्रकाश महाकाळकर,सपना पुरमशेट्टीवार यांनी स्थानिक युवक,महिला बचत गट,ग्रामस्तरीय समित्या लोकप्रतिनिधी व ग्रामस्थाचा सक्रिय सहभाग, ग्रामपंचायत स्तरावर विविध लोक लोकाभिमुख व सेवाभावी उपक्रम राबविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.स्वच्छतेची शपथ घेण्यात आली.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत अधिकारी अश्विन पेटकर संचालन मंगेश भोयर आभार प्रशांत लांबट यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी पस अधिकारी,जिप शाळा शिक्षक, ग्राप्र कर्मचारी विकास लांबट,पवनराजगडकर,अंगणवाडी सेविका यांनी परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये