ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
मिलन चौकात वाहतूक कोंडी

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :_ येथील महानगरपालिका परिसरातील मिलन चौकात दि.१८ सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास वाहतूक कोंडी झाली होती.बजाज पाॅलीटेक्निक काॅलेज रोड, महानगरपालिकेमागील रोड,पठाणपुरा रोड, गांधी चौक या रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनांची एकाच वेळी मिलन चौकात गर्दी झाली.त्यामुळे याठिकाणी वाहतूक कोंडी होऊन पायी चालणाऱ्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला, त्यामुळे भविष्यात अशा प्रकारची वाहतूक कोंडी होऊ नये.
यासाठी संबंधित यंत्रणेने मिलन चौकात योग्य ती व्यवस्था करून या परिसरात वारंवार होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडवावी अशी मागणी एकोरी वाॅर्डातील सामाजिक कार्यकर्ते तथा जिव्हाळा मित्र मंडळाचे मुख्य संचालक अॅड विनोद बोरसे यांनी केली आहे.



