मच्छीमार संस्थेची आमसभा शांततेत संपन्न
मच्छिंद्र मच्छुआँ सहकारी संस्थेच्या सभेत विविध विषयांवर चर्चा : सभासदांची मोठी उपस्थिती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
मच्छिंद्र मच्छुआँ सहकारी संस्था मर्यादित, भद्रावतीची वार्षिक सर्वसाधारण आमसभा गुरुवारी श्री बालाजी सभागृह येथे संस्थेचे अध्यक्ष दिलीप किसनराव मांढरे यांच्या नेतृत्वाखाली शांततेत पार पडली. सभेला संस्थेच्या सभासदांची मोठी उपस्थिती होती.
ज्येष्ठ सभासद संभाजी मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत मागील सन २०२४-२५ चा कामकाजाचा आढावा घेण्यात आला. तसेच सन २०२५-२६ च्या जमा-खर्च, नफा-तोटा, व्यापार पत्रक व ताळेबंद पत्रकाचे वाचन करण्यात आले. लेखापरीक्षण अहवाल, ऑडिट दोष दुरुस्ती, सभासदांचे हिस्से व भागभांडवल, रिक्त सचिव पदाची नियुक्ती आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.
मत्स्यबीज कमिशन, त्यावरील दंड तसेच चोरीची मासेमारी करणाऱ्या सभासदांकडील दंडाची वसुली न झाल्याने संबंधित सभासदत्वाबाबतही सभेत चर्चा झाली. सन २०२६-२७ साठी लेखापरीक्षकांची निवड करण्यासह इतर विषयांवर सभासदांनी आपली मते मांडली.
यावेळी प्रमुख अतिथी ॲड. अमोल बावणे, नगरसेवक गौरव नागपुरे, संचालक तथा नगरसेवक नंदुभाऊ पढाल, भारत नागपुरे यांची उपस्थिती होती. उपाध्यक्ष शंकर कामतवार, संचालक सुधाकर मांढरे, श्रीराम नागपुरे, सुरेश मांढरे, सुनील पारशिवे, राजेंद्र बगळे, संतोष नागपुरे, माजी अध्यक्ष रवींद्र नागपुरे, आशिष कार्लेकर, अशोक नागपुरे, संचालिका मंदा मांढरे, संगीता नागपुरे, उमाताई नागपुरे, राजू गैनवार आदी उपस्थित होते.
नगरसेवक नरेंद्र पढाल, ॲड. बावणे आणि नगरसेवक गौरव नागपुरे, यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. सभेचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार अध्यक्ष दिलीप मांढरे यांनी मानले. सभेची सांगता शांततेत झाली.



