ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विद्यार्थ्यांनी एनसीसी युनिटचा देशभक्ती, स्वयंशासन, शिस्त व विकासात्मक कार्यासाठी उपयोग घ्यावा : डॉ विवेक शिंदे

यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालयात एनसीसी युनिटचे उद्घाटन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

           यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे नुकतीच २१ महाराष्ट्र बटालियन एनसीसी युनिट ला प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. एनसीसी युनिट चे उद्घाटन आज मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयात करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना “विद्यार्थ्यांनी एनसीसी युनिटचा देशभक्ती, स्वयंशासन, शिस्त आणि विकासात्मक कार्यासाठी उपयोग करून घ्यावा असे मार्गदर्शन डॉ. विवेक शिंदे यांनी केले.

यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे २१ महाराष्ट्र एनसीसी युनिटच्या उद्घाटनाचा समारोह संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे अध्यक्ष, भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती, उद्घाटक सुभेदार, जसबीर सिंग ओ एफ चांदा, प्रमुख अतिथी प्रा डॉ कार्तिक शिंदे, सचिव, भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती, डॉ जयंत वानखेडे विश्वस्त, भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती , प्राचार्य डॉ एल एस लडके, प्राचार्य डॉ सुधीर मोते व्यासपीठावर उपस्थित होते.

उद्घाटक जसबीर सिंग यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना एनसीसी चे सामाजिक, वैयक्तिक जीवनातील फायदे, एनसीसी घेतल्याने आयुष्यात मिळणाऱ्या संधी, देशाहीतासाठी जबाबदारी स्वीकारण्याची मानसिक तयारी या संबंधी सविस्तर मार्गदर्शन केले. तर प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना प्रा डॉ कार्तिक शिंदे यांनी “विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी संस्था सदैव तत्पर आहे. आम्ही महाविद्यालयात अनेक सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत असतो. त्याचा योग्य वापर विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात करून देशसेवा करावी” असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. सुधीर मोते यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा किशोर ढोक यांनी केले तर आभार प्रदर्शन एएनओ डॉ प्रशांत पाठक यांनी केले. कार्यक्रमाला विद्यार्थी, एनसीसी चे पथक, शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये