ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पोंभुर्ण्यात श्री राज राजेश्वर मंदिरात महाआरती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, तालुका पोंभुर्णा यांच्या वतीने गुरुवारी पोंभुर्णा येथील श्री राज राजेश्वर मंदिरात भक्तिमय वातावरणात महाआरतीचे आयोजन करण्यात आले.

यावेळी श्री राज राजेश्वर महाराजांच्या चरणी महाआरती करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभावे तसेच देशाच्या प्रगतीसाठी प्रार्थना करण्यात आली.

या निमित्ताने भाजपच्या ‘सेवा संकल्प अभियान’ ची सुरुवात करण्यात आली. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत तालुकाभर आरोग्य शिबिरे, रक्तदान, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, गरजू व वंचित घटकांना मदत तसेच विविध सामाजिक जनजागृतीचे उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

तसेच १७ सप्टेंबर रोजी ‘आशीर्वादाचा दिवा’ हा उपक्रम राबविण्यात येत असून नागरिकांनी आपल्या घरात किंवा सार्वजनिक ठिकाणी दिवा प्रज्वलित करून सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमाला तालुका अध्यक्ष हरीश ढवस, प्रदेश महामंत्री महिला मोर्चा अल्का आत्राम, तालुका महिला मोर्चा अध्यक्षा वैशाली बोलमवार, नगराध्यक्षा सुलभा पिपरे, उपाध्यक्ष अजित मंगलगिरीवार, राहुल संतोषवार, विनोद देशमुख, गुरुदास पिपरे, ईश्वर नैताम, सुगत गेडाम, शहराध्यक्ष ऋषी कोटरंगे, युवा मोर्चा अध्यक्ष अजय मस्के, भाजप पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, शक्तिकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, युवा व महिला कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाआरतीनंतर उपस्थितांनी सेवा संकल्प अभियान यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये