ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सुधीरभाऊ रक्षा सूत्र एकल महिला संमेलन पोंभुर्णा येथे उत्साहात संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर
पोंभुर्णा : भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने आयोजित “सुधीर भाऊ रक्षा सूत्र एकल महिला संमेलन” मोठ्या उत्साहात व महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाले.
महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या एकल महिला सर्वेक्षण अभियानाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचाव्यात, यासाठी भाजपा महिला मोर्चाने पुढाकार घेत हा जनजागृती कार्यक्रम आयोजित केला. एकल महिलांनी शासनाकडे नोंदणी करून आगामी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले



