सहा मान्यवरांना ‘राजुरा भूषण’ सन्मान _ साळवे,डाॅ.मस्की
डाॅ.कातकर,डाॅ.बोबडे,डाॅ.माने व जयपूरकर यांचा समावेश ; मुक्तीदिन उत्सव समितीतर्फे सत्कारमूर्तींची घोषणा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
राजुरा परिसराचे नाव विविध क्षेत्रांत उज्ज्वल करणाऱ्या सहा मान्यवरांची यंदाच्या ‘राजुरा भूषण’ सन्मानासाठी निवड करण्यात आली आहे. राजुरा मुक्तीदिन उत्सव समितीतर्फे या सत्कारमूर्तींची घोषणा करण्यात आली. यामध्ये राजुरा मुक्तिसंग्रामातील प्रत्यक्षदर्शी पिलाजी यादवराव साळवे, मुळ गाव विहिरगाव, उच्चशिक्षित बालरोग तज्ञ
डॉ. राहुल प्रभाकर मस्की, मुळ गाव गडचांदूर, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग क्षेत्रात पीएच.डी. मिळविणारे डाॅ. सिध्दांत सत्यपाल कातकर, मुळ गाव चनाखा, राजुरा क्षेत्रातील पहिली उच्चशिक्षित स्त्रीरोग तज्ञ डॉ.सुप्रिया दादाजी बोबडे – सावलिया, मूळ गाव राजुरा, जिवती तालुक्यातील उच्च विद्याविभूषित संस्थाचालक डॉ.नारायण ज्योतीबा माने, मूळ गाव शेणगाव आणि नाट्य, कला व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत ध्येयवादी शिक्षिका सरिता बाबुराव जयपुरकर – सुर्तिकर, मूळ गाव राजुरा या सर्वांची त्यांच्या योगदानाबद्दल त्यांची ‘राजुरा भूषण’ पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
या सहाही सत्कारमूर्तींचा गौरव राजुरा – हैद्राबाद मुक्तीसंग्राम दिनी दिनांक १७ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता, सम्राट सेलिब्रेशन हॉल, राजुरा येथे आयोजित राजुरा मुक्तीदिन सोहळ्यात करण्यात येणार आहे. “राजुराच्या मातीचा इतिहास आणि वर्तमानातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा गौरव” या भावनेतून गेल्या १९ वर्षापासून हा उपक्रम राबविण्यात येत असून, नागरिकांनी कार्यक्रमास मोठ्या संख्येत उपस्थित राहावे, असे आवाहन राजुरा मुक्तीदिन उत्सव समितीतर्फे करण्यात आले आहे.



