कोरपणात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
ध्वजारोहणासह सामाजिक व शैक्षणिक उपक्रम; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्तही विशेष उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
कोरपणा : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त भारतीय जनता पक्ष, कोरपणा यांच्या वतीने १७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजता स्थळ शिवाजी चौक कोरपणा बस स्टॉप येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात ध्वजारोहणासह विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप तसेच विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय हंसराज अहिर माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा मा राष्ट्रीय ओ बी सी ओयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपस्थित राहणार आहे तसेच
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोक प्रिय आमदार देवरावदादा भोंगळे राहणार असून प्रमुख उपस्थितीत मा आमदार संजय धोटे,मा खुशालभाऊ बोंडे,मा आमदार सुधर्शन निमकर, मा राजू घरोटे, मा नारायण हिवरकर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी तालुका अध्यक्ष,मा संजय मुसळे तालुकाध्यक्ष यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला मार्गदर्शन करण्यासाठी तसेच उपस्थितांना प्रेरणादायी विचार देण्यासाठी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
विशेष म्हणजे, १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस असून त्यानिमित्तही भाजपच्या वतीने विविध सामाजिक,शैक्षणिक व जनसेवा उपक्रमांना प्राधान्य देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, सामाजिक उपक्रम तसेच जनहिताचे विविध कार्यक्रम राबवून हा वाढदिवस सेवाभावी उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात येणार आहे.
मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास,स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेल्या बलिदानाची आठवण नव्या पिढीला व्हावी,तसेच सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण व्हावी,या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास नागरिक, विद्यार्थी,पालक व भाजप पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष व माजी अध्यक्ष श्री नारायण हिवरकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.



