ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नवेगाव मोरे येथे तान्हा पोळा मोठ्या उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. पोंभुर्णा

नवेगाव मोरे (पोंभुर्णा): पोंभुर्णा तालुक्यातील नवेगाव मोरे येथे तान्हा पोळ्याचा सण मोठ्या उत्साहात व पारंपरिक वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात गावातील नागरिक, महिला व बालकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

सणानिमित्त बालकांनी सजवलेल्या तान्हा बैलांसह हनुमान मंदिरापासून माता मंदिरापर्यंत भव्य रॅली काढली. ढोल-ताशांच्या गजरात व पारंपरिक घोषणांनी संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

रॅलीमध्ये प्रमुख सहभाग घेणाऱ्या बालकांमध्ये प्राप्ती भावेश पोलोजर, त्रिशिका कामेश अस्वले आणि धनश्री संजय कुमारे यांचा समावेश होता. याशिवाय गावातील अनेक बालकांनी आकर्षक वेशभूषा करून तान्हा पोळ्याच्या मिरवणुकीत सहभाग घेतला.

कार्यक्रमामुळे नवेगाव मोरे गावात आनंद, उत्साह आणि पारंपरिक संस्कृतीचे सुंदर दर्शन घडले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये