राज्यस्तरीय उत्कृष्ट अभियंता पुरस्काराने संजय दुलसिंग राठोड यांचा गौरव

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : सार्वजनिक बांधकाम विभागात (विशेष प्रकल्प) चंद्रपूर येथे उत्कृष्ट कार्य, उल्लेखनीय कामगिरी आणि कर्तव्यनिष्ठ सेवेसाठी.संजय दुलसिंग राठोड यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट अभियंता पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत राज्यस्तरावर हा सन्मान देण्यात आला.
राठोड यांनी आपल्या सेवाकाळात विविध विकासकामे गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी विशेष योगदान दिले आहे. कामाप्रती असलेली निष्ठा, प्रामाणिकपणा, उत्कृष्ट नियोजन आणि सातत्यपूर्ण मेहनत यामुळे त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे.
राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्या अधिकारी वर्ग, सहकारी, मित्रपरिवार, कुटुंबीय तसेच विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. हा पुरस्कार त्यांच्या आजवरच्या कार्याचा गौरव असून, यामुळे त्यांच्या कुटुंबीयांमध्ये आणि सहकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
“हा पुरस्कार माझ्यासाठी केवळ सन्मान नसून भविष्यात आणखी जबाबदारीने आणि समर्पणाने काम करण्याची प्रेरणा आहे,” अशी भावना राठोड यांनी व्यक्त केली.



