ध्यानरत्न रामाराजू यांचा राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेच्या वतीने सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देवाडा येथील डेबू सावली वृद्धाश्रमाच्या सभागृहात विशेष ध्यान आणि ज्ञानसाधना शिबिराचे आयोजन पिरॅमिड स्पिरिच्युअल सोसायटीज मुव्हमेंटच्या वतीने करण्यात आले होते. या एकदिवसीय ध्यान साधनाचे प्रमुख मार्गदर्शक सीनियर पिरॅमिड मास्टर ध्यानरत्न रामा राजू (विशाखापट्टणम) उपस्थित होते. यावेळी राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समितीच्या वतीने ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांच्या हस्ते गौरवचिन्ह ,मानवस्त्र व ग्रंथभेट देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे चंद्रपूर तालुकाध्यक्ष श्री.रंगराव पवार, महिला तालुकाप्रमुख सौ. रजनी बोढेकर, तालुका प्रचारक श्री. बाळकृष्ण झाडे , श्री. मधुकरराव बोबडे, ज्येष्ठ महिला प्रचारक श्रीमती नंदाताई जोशी, आशाताई बुरडकर,सौ. नलिनी निखाडे आदी ध्यानप्रेमी उपस्थित होते. मानवी जीवनात ध्यानाचे महत्व यावर सविस्तर मार्गदर्शन करीत श्री . रामाराजु यांनी ध्यानसाधना सत्र घेतले. निशाताई धोंगडे यांनी डेबू सावली वृद्धाश्रमाची माहिती दिली तर श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या तत्त्वज्ञानात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलेली सामुदायिक प्रार्थना व ध्यान यावर बंडोपंत बोढेकर यांनी प्रकाश टाकला.
सूत्रसंचालन मुकूंद दिंडोकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सुधाताई मुळे यांनी केले.


