पोलीस स्टेशन देवळी पोलिसांनी सट्टा पट्टीचा जुगार चालविणारवर केली कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 8/9/ 2026 रोजी पोलीस स्टेशन देवळी हद्दीतील केदार लेआऊट येथे राहणार आरोपी नामे अक्षय तुळसीराम शेलोकर वय 23 वर्षे राहणार केदार लेआऊट देवळी हा कागदावर सट्टा पट्टी चे आकडे घेऊन जुगार चालवीत आहे अशी गुप्तदाराकडून गुप्त माहिती वरुन आरोपीवर जुगार कायद्यान्वये रेड केली असता जुगार साहित्य व रोख रक्कम मिळून एकुण किंमत 5,890/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपीस ताब्यात घेऊन आरोपीविरुधद पोलीस स्टेशन देवळी येथे गुन्हा नोंद करण्यात आला सदरची कार्यवाही सौरभकुमार अग्रवाल पोलीस अधिक्षक वर्धा सदाशिव वाघमारे अप्पर पोलीस अधिक्षक वर्धा वंदना कारखेले उपविभागीय पोलीस अधिकारी पुलगांव यांच्या मार्गदर्शनाखाली देवळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन मदनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक कल्पेश मगरे पोलीस स्टेशन देवळी पोलीस उपनिरिक्षक शिवराज जाधव पोलीस स्टेशन देवळी यांनी केलेली आहे.



