ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राशन कार्डधारकांनो.., आधार अद्ययावत करा..!

तालुका पुरवठा विभागाचे आव्हान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी तालुक्यातील सर्व राशन कार्डधारकांनी आपल्या शिधापत्रिकेला आधार कार्ड जोडणी व आधार अद्ययावतीकरण करून घेण्याचे आवाहन तहसीलदार शुभम बहाकर व पुरवठा निरीक्षन अधिकारी शैलेश झोडापे यांनी केले आहे.

तालुक्यात सुमारे २१ हजार राशन कार्ड असून, त्यामध्ये जवळपास ७२ हजार लाभार्थी आहेत. आतापर्यंत आधार अद्ययावतीकरणाचे सुमारे ५० टक्के काम पूर्ण झाले असून, अद्याप मोठ्या प्रमाणात लाभार्थींचे केवायसी प्रलंबित आहे.

राशन कार्डची केवायसी प्रक्रिया पूर्ण करताना मोबाईल क्रमांक तसेच राशन कार्डमधील माहिती अद्ययावत करणे आवश्यक आहे. शिधापत्रिकेवरील आरसी क्रमांकासोबत आधार क्रमांक अद्ययावत करण्यासाठी चालू वर्षाचा उत्पन्नाचा दाखला व मोबाईल क्रमांकाची आवश्यकता आहे.

याशिवाय राशन कार्डमधील नावात दुरुस्ती करणे, नवीन सदस्याचे नाव वाढविणे, मृत व्यक्तीचे नाव कमी करणे, नाव कमी करणे तसेच शिधापत्रिका वर्ग करणे आदी कामांसाठीही आधार अद्ययावत असणे आवश्यक आहे.

तालुक्यातील अनेक नागरिक नव्याने वास्तव्यास आल्याने किंवा विविध कारणांमुळे त्यांच्या शिधापत्रिकेवरील माहिती अद्ययावत झालेली नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणताही विलंब न करता आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार व राशन कार्डची माहिती अद्ययावत करून घ्यावी.

अद्याप केवायसी प्रलंबित असलेल्या सर्व राशन कार्डधारकांनी तातडीने तालुका पुरवठा विभागाशी संपर्क साधून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन तहसीलदार शुभम बहाकर व पुरवठा निरीक्षन अधिकारी शैलेश झोडापे यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये