ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्धा जिल्हा पोलीस दलाची माहे ऑगस्ट-२०२६ ची मासिक गुन्हे आढावा बैठक संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने माहे ऑगस्ट-२०२६ ची मासिक गुन्हे आढावा बैठक आज दिनांक ०८/०९/२०२६ रोजी पुलगाव (जि. वर्धा) येथे मा. पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल आणि मा. अपर पोलीस अधीक्षक, वर्धा श्री सदाशिव वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. संपूर्ण जिल्हाभरातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

बैठकीच्या सुरुवातीला विविध उपविभाग व शाखांच्या अधिकाऱ्यांकडून तांत्रिक व कायदेविषयक महत्त्वाच्या विषयांवर पीपीटी (PPT) द्वारे सादरीकरण करण्यात आलेः

१. PIT NDPS प्रस्तावः उपविभागीय पोलीस अधिकारी, हिंगणघाट श्री सुशील कुमार नाईक यांनी PIT NDPS कारवाई प्रस्तावाबाबत सविस्तर माहिती दिली.

२. ध्वनी प्रदूषण SOP: उपविभागीय पोलीस अधिकारी, वर्धा श्री सुनील महाडीक यांनी ध्वनी प्रदूषण नियंत्रणासंबंधीच्या मानकांवर (SOP) सादरीकरण केले. महाराष्ट्र पोलीस कायदा, अन्वये दंडात्मक कारवाई, भारतीय न्याय संहिता, BNS अंतर्गत उपद्रव रोखण्याच्या तरतुदी, पर्यावरण संरक्षण कायदा, ध्वनी प्रदूषण नियम, मोटार वाहन कायदा तसेच एनसीमध्ये बोलविण्याचा अधिकार, विरोध केल्यास बी.पी. अॅक्ट, मकोका आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या अंतर्गत करावयाच्या कारवायांबाबत माहिती देण्यात आली.

३. स्वयंमूल्यांकन (Self Assessment): उपविभागीय पोलीस अधिकारी, पुलगाव श्रीमती वंदना कारखेले यांनी स्व-मूल्यांकन विषयावर सादरीकरण केले.

4. NATGRID प्रणालीः सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री चंद्रकांत पाटील यांनी NATGRID या प्राणलीच्या वापराबद्दल सविस्तर सादरीकरण केले.

५. दहशतवाद प्रणाली व डिजिटल आव्हानेः प्रभारी अधिकारी, एटीएस नागपूर युनिट यांनी दहशतवाद प्रणाली आणि ‘Anti-Terrorism Squad’ विषयी सादरीकरण केले.

६. आगामी सण-उत्सव सुरक्षा व शाखा कामकाजः आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सहायक पोलिस निरीक्षक

श्री मिलिंद दवणे विशेष शाखा (DSB) यांनी सुरक्षा नियोजनाचे सादरीकरण केले. प्रभारी अधिकारी DSB यांनी शाखा कामकाजाबाबत माहिती दिली.

७. N.C.L. Review: मा. अपर पोलीस अधीक्षक, वर्धा श्री सदाशिव वाघमारे यांनी N.C.L. बाबींचा आढावा घेतला.

मा. पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी खालील प्रमाणे सूचना दिल्या :

पीपीटी सादरीकरणानंतर घेतलेल्या गुन्हे आढावा बैठकीत मा. पोलीस अधीक्षक यांनी खालीलप्रमाणे निर्देश दिलेः

१. अमली पदार्थ विरोधी कारवाई व जनजागृतीः अमली पदार्थ (ड्रग्ज) विरोधी कडक कारवाई करतील.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये