अमली पदार्थमुक्त समाजासाठी जनजागृती कार्यक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
अमली पदार्थमुक्त समाजासाठी जनजागृती कार्यक्रम (Awareness Programs) आयोजित करून लोकांना अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबद्दल माहिती देऊन परावृत्त करावे. अमली पदार्थांच्या गुन्ह्यांमध्ये लिप्त असणाऱ्यांवर मकोका (MCOCA), एमपीडीए (MPDA), पिट एनडीपीएस (PIT NDPS) यांसारख्या कायद्यांनुसार अत्यंत कडक कारवाई करतील.
२. शहर वाहतूक नियंत्रण व शिस्तः शहरामध्ये वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करून वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक शाखेच्या अंमलदारांची नेमणूक करून नियमित पेट्रोलिंग (गस्त) करतील. या कारवाई दरम्यान सर्वसामान्य नागरिकांना किंवा वाहतुकीला कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी.
३. आगामी सणांनिमित्त बंदोबस्तः आगामी येणाऱ्या सणांनिमित्त शहरात योग्य प्रकारे पोलीस बंदोबस्त लावावा
सर्व नियम पाळले जातील यासाठी आवश्यक आणि योग्य उपाययोजना केल्या जातील,
४. सोशल मीडियावर देखरेखः सोशल मीडियावर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवावे. कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह मजकूर किंवा प्रकार घडणार नाहीत याकडे कटाक्षाने लक्ष दिले जावे.
५. गुन्ह्यांचा शोध व तपासः घडलेल्या गुन्ह्यांचा/दाखल गुन्ह्यांचा जलद गतीने शोध घेऊन ते लवकरात लवकर
सोडवण्यात यावे या करिता प्रयत्न करतील.
६. अवैध दारू विक्री व तस्करीवर कडक कारवाई करावी.
७. न्यायालयीन कारवाई व दोषसिद्धीः गुन्ह्यांचा योग्य आणि शास्त्रोक्त पद्धतीने तपास करावा. न्यायालयात भक्कम व योग्य पुरावे सादर करून आरोपींच्या दोषसिद्धीचे प्रमाण वाढवावे
८. घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी व मुद्देमालचा कसोशीने शोध घेऊन दाखल गुन्ह्यांचा जलद निपटारा करावा
९. हरविलेले व्यक्ती व बालकांचा (Missing) SOP प्रमाणे दिलेल्या सूचनांचे पालन करून जलद गतीने शोध घ्यावा.
१०. अवैध जुगाराच्या ठिकाणांवर शोध मोहीम राबवून कारवाई करावी.
११. सर्व पोलीस ठाणेदारांनी आपापल्या हद्दीत नियमित ‘संवाद’ बैठकांचे आयोजन करावे.
१२. पोलीस ठाणे स्तरावर सर्व अधिकारी व अंमलदारांची नियमित बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घ्यावा,
या बैठकीला वर्धा जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस ठाण्यांचे ठाणेदार, स्थानिक गुन्हे शाखा, सायबर पोलीस ठाणे, विशेष शाखा आणि इतर सर्व संबंधित शाखांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. आढावा बैठकी नंतर मा. पोलिस अधीक्षक आणि अपर पोलिस अधीक्षक यांनी आढावा बैठकीत उपस्थित सर्व अधिकारी व अंमलदार यांच्यासोबत स्नेहभोजन घेतले



