ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावतीत शिवसेनेतर्फे भव्य दहीहंडी उत्सव

५ व ६ सप्टेंबरला रंगणार विविध सांस्कृतिक कार्यक्रम : अभिनेता क्षितीज दाते, अभिनेत्री गायत्री दातार यांची विशेष उपस्थिती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

            आगामी श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भद्रावती शहरात शिवसेनेतर्फे भव्य दहीहंडी उत्सव २०२६ आयोजित करण्यात आला आहे. शनिवार, ५ सप्टेंबर आणि रविवार, ६ सप्टेंबर रोजी हनुमान नगर, नेताजी कॉलनी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानावर हा उत्सव रंगणार आहे. उत्सवाच्या निमित्ताने दहीहंडी, रांगोळी स्पर्धा, वेशभूषा व संवाद स्पर्धा, विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

शनिवार, ५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत कार्यक्रमांची रेलचेल राहणार असून, या दिवशी ‘तुला पाहते रे’ फेम अभिनेत्री गायत्री दातार यांची विशेष उपस्थिती आकर्षण ठरणार आहे. तसेच लावणी सम्राज्ञी रजनी पुणेकर यांचा लावणी कार्यक्रम आणि अँकर परेश यांच्या निवेदनाची रंगतही पाहायला मिळणार आहे.

रविवार, ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत दहीहंडी व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणून अभिनेता क्षितीज दाते उपस्थित राहणार असून, त्यांच्या उपस्थितीमुळे उत्सवाला विशेष रंगत येणार आहे.

उत्सवाचे प्रमुख उपस्थिती अॅड. आशिषजी जयस्वाल असून, त्यांच्या हस्ते व उपस्थितीत विविध कार्यक्रम होणार आहेत. यावेळी दहीहंडी फोडण्यासाठी पुरुष व महिला गोविंदा पथकांसाठी आकर्षक रोख बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे. त्याचबरोबर वेशभूषा, संवाद, रांगोळी तसेच सांस्कृतिक स्पर्धांमध्येही विजेत्यांना बक्षिसे देण्यात येणार आहेत.

सामाजिक उपक्रमालाही प्राधान्य

उत्सवाच्या निमित्ताने रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे मनोरंजनासोबतच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमालाही या कार्यक्रमात महत्त्व देण्यात आले आहे.

हा भव्य उत्सव लोकसभा संघटक मुकेश जीवतोडे यांचे मार्गदर्शनात समस्त शिवसेना परिवार, भद्रावती यांच्या वतीने आयोजित करण्यात आला असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दहीहंडी उत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्ष प्रफुल चटकी व आयोजकांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये