ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हिंगणीतील वनकामगारांच्या साखळी उपोषणाची जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल

संबंधित विभागाला अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा :_ हिंगणी येथील वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर राष्ट्रीय मजदूर काँग्रेस महाराष्ट्र शाखेच्या वतीने सुरू असलेल्या साखळी उपोषणाची जिल्हाधिकारी कार्यालयाने दखल घेतली आहे. उपोषणकर्त्यांच्या मागण्यांबाबत संबंधित विभागाकडून आवश्यक कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

राष्ट्रीय मजदूर काँग्रेस महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष भास्करराव मुडे यांच्या नेतृत्वाखाली दि. 20 जुलै 2026 पासून हिंगणी येथे साखळी उपोषण सुरू आहे. उपोषणाला 31दिवस उलटूनही मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्याने आंदोलकांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता.

यासंदर्भात दि. 11 ऑगस्ट 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून उपवनसंरक्षक, वनविभाग, वर्धा तसेच तहसीलदार, सेलू यांना पत्र पाठविण्यात आले आहे. उपोषणकर्त्यांच्या मागण्यांबाबत संबंधित कार्यालयाकडून माहिती घेऊन आवश्यक कार्यवाही करण्यास सांगण्यात आले आहे.

वनविभागातील कामगारांच्या प्रलंबित मागण्या, अनेक वर्षे सेवा करूनही हक्कांपासून वंचित असलेले कामगार तसेच वयोवृद्ध कामगारांच्या रोजगार व वेतनासंदर्भातील प्रश्न प्रशासनाने गांभीर्याने घ्यावेत, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाने या प्रकरणाची प्रत वर्धा पोलीस अधीक्षक, संबंधित वनअधिकारी तसेच राष्ट्रीय मजदूर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना माहितीस्तव पाठविली आहे. त्यामुळे आता वनविभागाकडून कोणती कार्यवाही केली जाते, याकडे हिंगणीतील वनकामगारांचे लक्ष लागले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये