ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सकल हिंदू समाज देऊळगाव राजा तालुकाच्या वतीने कावड यात्रा नगर प्रदक्षिणा सोहळा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

दरवर्षी प्रमाणे यंदाही हिंदू समाज देऊळगाव राजा तालुका च्या वतीने कावड यात्रा सोहळ्याचा कार्यक्रम 24 ऑगस्ट रोजी देऊळगाव राजा येथे आयोजित करण्यात आला.

सदर कार्यक्रमाची सुरुवात महादेव मंदिर सावखेड भोई परिसर येथून कावड यात्रेची सुरुवात करण्यात आली . सदर कावड यात्रा नगर‌ प्रदक्षिणा साठी देऊळगाव राजा बायपास, शिंगणे नगर, जालना रोड,धोंडीराम महाराज मठ, वाल्मीक नगर, माळीपुरा वेश, बालाजी महाराज मंदिर, संतोषी माता मंदिर, चिखली रोड चौंडेश्वरी मंदिर, महात्मा फुले चौक, जुना सरकारी दवाखाना, जुना जालना रोड, संतोष चित्रमंदिर चौक मार्गे, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, बसस्थानक चौक, जाफराबाद रोड, छत्रपती शिवाजी महाराज राजे चौक, सिविल कॉलनी मार्गे खोरेश्वर महादेव मंदिर येथे कावड यात्रा ची सांगता करण्यासाठी पोहचली. मोठ्या भाविक भक्तीने यात्रेचे आयोजन करण्यात आले ठीक, ठिकाणी रस्त्यावर रांगोळी काढून सुवासिनींनी कावड यात्रेचे मोठ्या भक्ती भावाने पूजन केले सदर कार्यक्रमासाठी नवयुवक,युवती, नागरिक,महिला सर्व धर्मीय नागरिक कावड यात्रेमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“हर,हर, महादेव” च्या जयघोषाने परीसर दुमदुमून गेला होता.शांतता व सुव्यवस्था साठी पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये