ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिवराज मालवी यांना सोलापूर येथील राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत चार सुवर्ण पदक तर एक रजत पदक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रह्मपुरी :- भारताच्या 78 व्या स्वातंत्र्यदिना निमित्त सोलापूर जिल्हा मास्टर्स ॲक्वॅटिक असोसिएशन, सोलापूर, अखिल भारतीय मारवाडी युवा मंच सोलापूर व अर्थक्रांती जीवन गौरव अभियान सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील मास्टर्स जलतरणपटूंसाठी भव्य राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेचे आयोजन शनिवार दिनांक 22 ऑगस्ट 2026 रोजी अशोक चौक ,पोलीस मुख्यालय सोलापूर येथील श्री मार्कंडेय जलतरण तलाव येथे करण्यात आली होते.या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील सुमारे 300 जलतरणपटू सहभागी झाले होते.चंद्रपुर जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करत ब्रह्मपुरी येथील सेवानिवृत्त शिक्षक शिवराज मालवी यांनी आपल्या 60 ते 64 वयोगटात विविध जलतरण प्रकारात सहभाग नोंदवला व जिद्दीने सहभागी होत 4 सुवर्ण पदक तर 1 रजत पदक प्राप्त करून पुन्हा एकदा राज्यस्तरीय स्पर्धेत नेत्रदीपक यश संपादन करीत ब्रह्मपुरीचे नाव राज्यस्तरावर रोशन केले.

      शिवराज मालवी यांनी या राज्यस्तरीय स्पर्धेत 50 मीटर फ्रिस्टाईल,50 मीटर बॅकस्ट्रोक,50 मीटर ब्रेस्टस्ट्रोक,व 100 मीटर बॅकस्ट्रोक मध्ये सुवर्ण पदक तर 100 मीटर फ्रिस्टाईल मध्ये रजत पदक प्राप्त केले. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र प्रशंसा केली जात असून त्यांच्या यशाबद्दल क्रीडा क्षेत्र व मित्रमंडळी कडून अभिनंदन केले गेले व आणखी पुढिल यशासाठी शुभेच्छा दिल्यात.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये