ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विदर्भ महाविद्यालयात नव मतदार नोंदणी शिबिर संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- व्यंकटेश बहुउद्देशीय संस्था गडचांदूर द्वारा संचालित विदर्भ कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स जिवती येथील राज्यशास्त्र विभागामार्फत तसेच तहसिल कार्यालय येथील महसूल विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने महसूल सप्ताह निमित्त महाविद्यालयामध्ये नव मतदार नोंदणीचे शिबिर घेण्यात आले ज्या विद्यार्थ्यांचे वय १८ वर्षे पूर्ण झाले त्यांच्याकडून मतदार नोंदणीचा फार्म भरून घेण्यात आला सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. एस एस शाक्य या होत्या ज्या विद्यार्थ्यांचे १८ वर्षे पूर्ण झालेले आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी मतदार यादी मध्ये आपले नाव नोंद करावे असे आव्हान त्यांनी केले तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिवती तहसील चे तहसीलदार अविनाश शेंबटवाढ यांनी आपला देश हा सर्वात मोठा लोकशाहीचा देश आहे आणि आपल्या देशातील लोकशाही बळकट करायची असेल तर नव मतदारांनी मतदार यादी मध्ये नाव नोंदणी करणे गरजेचे आहे तसेच येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदान करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन प्रमुख मार्गदर्शनात केले.

सदर कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच तहसील कार्यालयातील कर्मचारी यांनी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये