ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरपणा तालुक्यात आरसीपीएल कंपनीच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह

तहसीलदारांकडून चौकशीचे आदेश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपणा :- तालुक्यातील मुुकुटबन परिसरात आर.सी.पी.एल. सिमेंट कंपनीकडून सुरू असलेल्या बांधकाम व जमीन व्यवहारासंदर्भात गंभीर तक्रारी समोर आल्या आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश तहसीलदार कोरपणा यांनी दिले आहेत. तहसीलदार कार्यालयाकडून 20 जुलै 2026 रोजी मंडळ अधिकारी, कोरपणा व तलाठी यांना पत्र देण्यात आले आहे. संबंधित पत्रानुसार, आरसीपीएल कंपनीकडून मुकुटबन परिसरात औद्योगिक प्रकल्पासाठी जमीन व्यवहार व बांधकाम करण्यात येत असल्याचा उल्लेख आहे.

तक्रारीनुसार, कंपनीने काही जमिनीची खरेदी केल्यानंतर आवश्यक परवानग्या व बांधकाम नियमांचे पालन केले आहे का, याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. तसेच काही ठिकाणी परवानगीपूर्वीच बांधकाम करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला असून, याबाबत प्रशासनाने वस्तुस्थिती तपासण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय, संबंधित जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहाराची कागदपत्रे, परवानग्या, बांधकामाची वैधता तसेच शासनाच्या नियमांचे पालन झाले आहे किंवा नाही, याची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

“प्रकरणाची योग्य ती चौकशी करून आवश्यक कागदपत्रे व पुराव्यांसह तात्काळ अहवाल सादर करावा,” असे तहसीलदारांच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. या आदेशामुळे आरसीपीएल कंपनीच्या प्रकल्पासंदर्भातील जमीन व्यवहार, बांधकाम परवानगी आणि नियमपालनाचा मुद्दा ऐरणीवर आला असून, चौकशीच्या अहवालाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

एक महीना लोटून सुद्धा मंडल अधिकारी व ग्राम महसुल अधिकऱ्यानी चौकशी करुण अहवाल सादर केलेले नाही प्रशासनाच्या तपासणीनंतर नेमकी वस्तुस्थिती समोर येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालया कडून प्रसिद्ध करण्यात आलेला जाहीरनाम्यावर आक्षेप दाखल केले असल्याने सदर प्रकरण न्यायलयाच्या दालणात दाखल होणार आहे आर सि पि पि एल कंपनीने यवतमाळ व चन्द्रपुर जिल्हयात चुकीच्या पध्दतीने नियमबाह्य कामे करुण शर्तीभंग केल्याने तसेच सक्षम प्राधिकरणाचे मान्यता न घेता मनमानी कारभार करीत बांधकाम केल्याने वराती मागुन घोडे हाकण्यासाठी कंपनी धडपड करीत असल्याचा आरोप करीत विभागीय आयुक्त चन्द्रपुर /यवतमाळ येथिल जिल्हाधिकारी सहसंचालक .

नगररचना विभाग यांचे कडे राष्ट्रवादी कॉग्रेस चे प्रदेश सचिव आबीद अली यांनी चौकशी व कार्यवाही ची मागणी केली आहे कंपनीच्या जडवाहन वाहतुकीमुळे परसोडा रस्त्याचा बोजवारा झाल्याने स्थानिका मध्ये असंतोष वाढला आहे प्रशासनाच्या निर्णया कडे जनतेचे लक्ष लागले आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये